नागपूर :-दिनांक २५.८.२०२४ रोजी सक्करदरा पोलीस ठाणे नागपूर शहर पोलीस येथे मेहबूब शेख प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) ह्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यासाठी का पोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली.प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख ह्यांनी टीव्ही9 वाहिनीवर दिलेली मुलाखत अतिशय अशोभनीय व एका महिलेचा अपमान करणारी असून असंसदीय शब्दाचा वापर करून चित्रा वाघ ह्यांच्या विरुद्ध काढलेले उदगाराच्या मेहबूब शेख वर नियमानुसार गुन्हा दाखल करावा या साठी हि तक्रार नागपूर शहर महिलामोर्चा च्या वतीने भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष प्रगती पाटील, महामंत्री मनीषा काशीकर,प्रीती राजदेरकर,निशा भोयर,निकिता पराये,माजी नगरसेविका दिव्या धुरडे,माजी नगरसेविका रिता मुळे,माजी नगरसेविका स्वातीआखतकर,ज्योती देवघरे, कविता इंगळे, आशा गुप्ता,सुषमा चौधरी,वर्षा कलोडे,कीर्ती शेंडे, रेखा चव्हाण, अरुणा इटनकर,चेतना सातपुते, शिल्पा पोहाणे,सोशल मीडिया सहसंयोजीका रूपल दोडके व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली .