नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार (ता.12) 20 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. माँ अन्नपुर्णा हॅपी फुड, मानेवाडा रोड, नागपूर यांच्यावर हॉटेलचा कचरा नाल्यात टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मे. माँ अन्नपुर्णा हॅपी फुड, बेसा रोड, नागपूर यांच्यावर हॉटेलचा कचरा नाल्यात टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. अपोलो लॅब, मनीष नगर, नागपूर यांच्यावर जैव वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यासोबत आढळून आल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरु नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे ए.बी. खान, संघर्ष नगर, वाठोडा, नागपूर यांच्यावर रस्त्यावर कचऱ्या आढळून आल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे तसेच मे. बालाजी स्वीट् तांडापेठ, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. वीर रेसीडेंसी, झींगाबाई टाकळी, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.