विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाच्या वेळेत वाढ

मुंबई :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी दिनांक २६ जून २०२४ रोजी मतदान होत आहे. काही संघटनांनी या मतदानाची वेळ वाढविण्यासाठी केलेली मागणी भारत निवडणूक आयोगाने मान्य केली असून; आता मतदानाची वेळ सकाळी ७.०० वाजेपासून सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अशी असेल.

या निवडणुकीसाठी शुक्रवार, ३१ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांकरिता बुधवार, दि.२६ जून रोजी मतदान तर सोमवार, दि.१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कारखाली चिरडून वयोवृद्ध सासर्‍याची हत्या

Wed Jun 12 , 2024
– हत्येसाठी दिली सुपारी – बहिण भावाची महत्वाची भूमीकाhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 – पोलिस आयुक्तांची माहितीhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 नागपूर :- संपत्तीसाठी वयोवृद्ध सासर्‍याला कार खाली चिरडून जीव घेतल्याची थरार घटना 22 मे रोजी अजनी पोलिस ठाण्याअंतर्गत उघडकीस आली. पुरूषोत्तम पुट्टेवार (82) असे मृतकाचे नाव आहे. हत्या करण्यासाठी सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने सखोल तपास करून 6 आरोपींना अटक केली. तसेच आतापर्यंत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com