धान खरेदीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

मुबई :- खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास शासनाने दि. 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासनाने शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात धान खरेदी करण्याची मुदत 31 जानेवारी 2024 पर्यंत होती. मागील हंगामाच्या तुलनेत राज्यात अद्यापपर्यंत कमी धान खरेदी झाली आहे. याचा विचार करता शासनाने दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी दि. 31 मार्च 2024 रोजीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याचा फायदा राज्यातील लाखो नोंदणीकृत शेतकऱ्यांना होणार आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सरकारच्या विश्वासघात विरोधात संविधान चौकात आदिमांचे भव्य नारे - निदर्शने

Thu Feb 29 , 2024
– हलबांचा विश्वासघात विरोधात निवडणुकीत परिणाम दाखवू — आदिम नेत्या ॲड.नंदा पराते  नागपूर :- संविधान चौकात राष्ट्रीय आदिम कृती समितीने भाजप सरकार विरोधात आंदोलन केले ,त्यावेळेस शेकडो हलबा बांधवांची उपस्थिती होती. सुरुवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.बीजेपीच्या सरकारने घटना यादीत असलेल्या हलबा जमातीसंबंधी कोष्टी हा व्यवसाय असल्याची अधिसूचना काढून न्याय द्यावा, ही मागणी घेऊन संविधान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!