नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार गुरुवार दिनांक 30 मार्च, 2023 ला “श्री राम नवमी” निमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेव्दारे कार्यवाही करण्यात येईल, अशी सूचना डॉ. गजेंद्र महल्ले उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी केली आहे.