मनसर येथील “हर घर दत्तक” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रामटेक  :- ग्राम पंचायत मनसर येथे कोविड-19 च्या लसीकरणासाठी हर घर दत्तक हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
       सदर कार्यक्रम ग्राम पंचायत मनसर च्या सरपंच सौ योगेश्वरी हेमराज चोखांड्रे यांच्या पुढाकाराने आणि मा श्री प्रदिप बमनोटे गट विकास अधिकारी रामटेक यांच्या मार्गदर्शनाखाली नुरी जामा मस्जिद वार्ड क्रमांक 1 पासून सुरवात करण्यात आली त्यात अनेक नागरीकांनी कोविड19 प्रतिबंधक लस घेतली.
    हर घर दस्तक कार्यक्रमात रामटेक तालुका आरोग्य अधिकारी मा श्री चेतन नाईकवर व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकिय अधिकारी डॉ मंगेश रामटेके यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व युनायटेड वे संस्थेच्या मेघा कश्यप, इझाझ तुरक यांनी मोलाची कामगिरी बजावली.
       सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सरपंच सौ योगेश्वरी हेमराज चोखांड्रे ग्राम विकास अधिकारी श्री जीवनलाल देशमुख ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

सफाई मजदूर कांग्रेस अध्यक्ष का जन्मदिन मनाया गया

Sun Nov 21 , 2021
कामठी – तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी व कल्पना फाउंडेशन ने महाराष्ट्र सरकार से समाजभूषण से सम्मानित व अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस कामठी के शहर अध्यक्ष व महर्षि वाल्मिकी सेवा मंडल के पूर्व कार्याध्यक्ष रमेश महेरोलिया का जन्मदिन तेजस संस्था के अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार की अध्यक्षता एवं कल्पना फाउंडेशन की संचालक कल्पना तांबे की प्रमुख उपस्थिति में  सामाजिक कार्यो के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com