रामटेक :- ग्राम पंचायत मनसर येथे कोविड-19 च्या लसीकरणासाठी हर घर दत्तक हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
सदर कार्यक्रम ग्राम पंचायत मनसर च्या सरपंच सौ योगेश्वरी हेमराज चोखांड्रे यांच्या पुढाकाराने आणि मा श्री प्रदिप बमनोटे गट विकास अधिकारी रामटेक यांच्या मार्गदर्शनाखाली नुरी जामा मस्जिद वार्ड क्रमांक 1 पासून सुरवात करण्यात आली त्यात अनेक नागरीकांनी कोविड19 प्रतिबंधक लस घेतली.
हर घर दस्तक कार्यक्रमात रामटेक तालुका आरोग्य अधिकारी मा श्री चेतन नाईकवर व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकिय अधिकारी डॉ मंगेश रामटेके यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व युनायटेड वे संस्थेच्या मेघा कश्यप, इझाझ तुरक यांनी मोलाची कामगिरी बजावली.
सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सरपंच सौ योगेश्वरी हेमराज चोखांड्रे ग्राम विकास अधिकारी श्री जीवनलाल देशमुख ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले