अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांसाठी मोफत शिधावस्तुंचे वितरण

भंडारा :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना चे शासनाकडून नियतन प्राप्त झालेले आहे. रास्तभाव दुकानदारांना पुरवठा करून कार्यरत पात्र शिधापत्रिकाधारकांना तातडीने वितरण करण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे.

ऑक्टोंबर 2022 मध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांना प्रति व्यक्त्तीला 1 किलो गहु, 4 किलो तांदुळ शिधावस्तुचे मोफत वितरण उपलब्ध करण्यात येईल.

नोव्हेंबर 2022 मध्ये प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 1 किलो गहु, 4 किलो तांदुळ व अंत्योदय शिधापत्रिका लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका धारकांना 5 किलो गहु, 30 किलो तांदुळ व 1 किलो साखर प्रति शिधापत्रिका धारकाला मिळणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हास्तरीय युवा उत्सव उत्साहात साजरा

Wed Oct 19 , 2022
भंडारा :- नेहरू युवा केंद्राच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त दिनांक 14 ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या संग्रामातील देशभक्तीची भावना रुंदगीत करणे आणि तरुण युवक कलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचे उद्देशाने चित्रकला, कविता लेखन, छायाचित्रण, भाषण स्पर्धा, सांस्कृतीक कार्यक्रम व जिल्हा युवा संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा व गोंदिया जिल्ह्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com