महावितरणच्या सुरक्षा व दक्षता विभागाच्या कारवाईत ११ कोटीची वीज चोरी उघड,२८८ ग्राहकांवर एफआयआर

नागपूर  : महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभाग अंतर्गत कार्यरत सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने मागील ९ महिन्यात केलेल्या कारवाईत सुमारे ११ कोटींची वीज चोरी उघडकीस आणली असून वीज चोरीतील दंडाची रक्कम न भरणाऱ्या २८८ वीज ग्राहकांच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरण कडून वीज ग्राहकांना अखंडीत वीज पुरवठा व इतर सेवा उत्तम पद्धतीने देण्यात येतात. परंतु वीज वितरण हानी व वीज चोरी यामुळे महावितरणचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. हे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व कमी करण्यासाठी सुरक्षा व अंमलबजावणी विभाग सातत्याने काम करीत असते. कार्यकारी संचालक यांच्या अधिपत्याखाली नागपूर प्रादेशिक विभाग अंतर्गत उपसंचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) यांच्या देखरेखी खाली नागपूर विभाग अंतर्गत मंडल स्तरावर १२ भरारी पथके व विभागीय स्तवरावर ३ भरारी पथके तसेच नागपूर व अकोला येथे सुरक्षा व अंमलबजावणी परिमंडल कार्यालय कार्यरत आहे.

नागपूर प्रादेशिक विभाग अंतर्गत सुरक्षा व अंमजबावणी विभागाकडून एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत एकूण ९,९२४ ग्राहकांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान १,९६८ ग्राहकांकडे वीज चोरी आढळून आली. या ग्राहकांविरूध्द विद्युत कायदा २००३ सुधारित २००७ कलम १३५ अन्वये कारवाई करून ११.०२ कोटी रुपये इतक्या रकमेच्या वीज चोरीचे प्रकरणे उघडकीस आणली. तसेच विद्युत कायदा २००३ कलम १२६ अन्वये व इतर ४०७३ प्रकरणांमध्ये ५९.०३ कोटी रुपये इतक्या रकमेची अनियमितता उघडकीस आणली. या कालावधीत एकूण ७०.०५ कोटी रुपये इतक्या रकमेचे निर्धारण करून त्यापैकी २९.८१ कोटीची रक्कम संबंधित ग्राहकांकडून वसूल करण्यात आली. तसेच वीज चोरीची रक्कम न भरलेल्या २८८ ग्राहकां विरूध्द विविध पोलीस स्टेशन मध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक सुनील थापेकार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे.

वीज चोरी सामाजिक अपराध आहे.त्यामुळे आपल्या परिसरात वीज चोरी होत असल्यास त्याबाबतची माहिती स्थानिक भरारी पथके, सुरक्षा व अंमलबजावणी कार्यालये किंवा जवळच्या महावितरणच्या कार्यालयास दयावी. वीज चोरी प्रकरणाची माहिती देण्या-या इसमास महावितरण कंपनीकडून योग्य ती बक्षिसाची रक्कम देण्यात येते. तसेच अशी माहिती देण्या-यांचे नाव सुध्दा गोपनीय ठेवले जाते.त्यामुळे याबाबत माहिती देऊन नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Celebrating ‘Women’s Day’  at Pramukh Swami Maharaj Nagar

Wed Jan 11 , 2023
– Women’s Day 2: Celebrating Women’s Empowerment Gujrat :- Tens of thousands gathered at Pramukh Swami Maharaj Nagar to participate in the evening assembly titled ‘Women’s Day 2: Celebrating Women’s Empowerment’. Women from around the world sang a medley of devotional hymns and women dignitaries paid tribute to Pramukh Swami Maharaj’s immense efforts to foster the holistic empowerment and development […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com