संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- येत्या 20 नोव्हेंबर ला होऊ घातलेल्या 58 कामठी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी कामठी विधानसभा मतदार संघात सज्ज करण्यात आलेल्या विविध मतदान केंद्रांना निवडणूक निरीक्षक सुनीलकुमार यांनी भेट देऊन तेथील उपलब्ध सोयी सुविधांसह व्यवस्थेची पाहणी केली.तसेच या मतदान केंद्र परिसरात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शौचालय,पिण्याचे पाणी,रॅम्प आदी भौतिक सुविधा उपलब्ध असल्याची खातरजमा करण्याच्या सूचनासह आवश्यक त्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गोसावी यांच्यासह सर्व संबंधित निवडणूक यंत्रणेला दिल्या. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश जगदाळे, दत्तात्रय निंबाडकर,नायब तहसीलदार मयूर चौधरी, नायब तहसीलदार राजाराम बमनोटे,नायब तहसीलदार ऊपेश अंबादे आदी उपस्थित होते.