पुणे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक खर्च दरनिश्चिती समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. निवडणूकीसाठी राजकीय पक्षांना आवश्यक साहित्य व प्रचारासाठीच्या विविध बाबींचे दर निश्चित करताना जिल्ह्याच्या विविध भागातील आणि जिल्ह्याबाहेरील दरांची माहिती घेण्यात यावी, असे निर्देश जिलहधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिली.
बैठकीला निवडणूक खर्च समन्वय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध प्रकारच्या निवडणूक खर्चाबाबत बाबनिहाय आढावा घेण्यात आला. दरनिश्विती करताना राजकीय पक्षांनादेखील प्रक्रियेची माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.