भोसरी विधानसभा मतदारसंघात महिला बचत गटासाठी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

पुणे :- भोसरी विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी कै. अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी येथे महिला बचत गटांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. पात्र महिलांनी मतदार नोंदणी करण्याबरोबरच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदान करावे, असे आवाहन स्वीप समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी केले.

कार्यक्रमाला भोसरी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी रेवणनाथ लबडे, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी अण्णा बोदाडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, सीताराम बहुरे, नायब तहसिलदार अर्चना देशपांडे आदी उपस्थित होते.

तांबे म्हणाल्या, राज्यात स्त्री-पुरुष मतदारांचे प्रमाण ९२५ इतके असून जिल्ह्यात त्यापेक्षा कमी मतदानाचे प्रमाण असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार महिलांसाठी विशेष मतदार नोंदणी व मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या https://www.eci. gov.in या संकेतस्थळावर किंवा वोटर हेल्पलाईन ॲपवर ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करता येते.

सर्व तालुक्याचे मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, मतदान केंद्रावर नेमलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यामार्फत मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना-६ मध्ये अर्ज भरुन देण्याची सोय करण्यात आली आहे. महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्ह्यात महिला संचलित मतदान केंद्र निर्माण करण्याचे कामकाज सुरु आहे, असेही तांबे म्हणाल्या.

लबडे म्हणाले, महिलांनी मतदार नोंदणी करण्यासाठी पुढे यावे. आपल्या परिचयातील महिलांनादेखील मतदार नोंदणी करण्याबाबत माहिती द्यावी.

महिला बचत गटाच्या सुमारे २५० ते ३०० महिलांनी या शिबिरात सहभागी होऊन मतदानाची शपथ घेतली.

श्रीमती तांबे यांनी एक्सलेंट इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड ज्यु. कॉलेज मोशी येथील कार्यक्रमातदेखील नवमतदारांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maha Governor Bais condoles the demise of Manohar Joshi

Fri Feb 23 , 2024
Mumbai :-Maharashtra Governor Ramesh Bais has expressed grief over the demise of former Chief Minister of Maharashtra and former Lok Sabha Speaker Manohar Joshi. In a condolence message, Governor Bais wrote; ” Manohar Joshi was one of the most respected political leaders in Maharashtra. A skilled organizer, outstanding parliamentarian, excellent orator, fiery opposition leader and respected Lok Sabha Speaker, Joshi […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com