‘एक वोट से ही फर्क पडता है…’ फ्लॅश मॉबद्वारे युवकांनी केला मतदानाचा जागर

नागपूर :- ‘एक वोट से क्या ही फर्क पडता है…’ असे म्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टी एँजाय करण्याऐवजी आपल्या मताचा नव्हे आपल्या अधिकाराचा वापर करून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवा, देशाच्या निर्मितीत योगदान देउन ‘एक वोट से ही फर्क पडता है…’ असे दाखवून द्या, असा संदेश फ्लॅश मॉब आणि पथनाट्याद्वारे युवकांनी दिला.

सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासन यांच्याद्वारे मंगळवारी (ता.२) सीताबर्डी मेट्रो इंटरचेंज येथे मॅट्रिक्स वॉरियर्सच्या स्वयंसेवकांनी फ्लॅश मॉब आणि पथनाट्याचे सादरीकरण केले.

यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा निवडणूक नोडल अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस उपायुक्त राहुल मदने, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  कुशल जैन, मनपा उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त मिलींद मेश्राम, उपायुक्त प्रकाश वराडे, सहायक आयुक्त महेश धामेचा, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी युवकांनी निवडणूक आयोगाचे अँम्बेसेडर म्हणून कार्य करावे तसेच 19 एप्रिल रोजी स्वतः मतदानाचा हक्क बजावावा सोबतच इतरांना देखील मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मॅट्रिक्स वॉरियर्सच्या युवकांद्वारे करण्यात आलेल्या सादरीकरणाचे कौतूक केले व युवकांनी मतदानासाठी पुढे येऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले. जिल्हा निवडणूक नोडल अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांनीही मतदानाची टक्केवारी वाढविण्यात युवकांची भूमिका असल्याचे सांगत त्यांनी जास्तीत जास्त युवकांनी या जनजागृती मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

यावेळी उपस्थितांनी मतदान करण्याची शपथ घेतली.

सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नागपूर शहरातून जास्तीत जास्त मतदान व्हावे व ७५ टक्के मतदानाचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरिता मंगळवारी (ता.२) सीताबर्डी मेट्रो इंटरचेंज येथे युवकांनी मतदानाचा जागर केला. ‘स्वीप’ अंतर्गत मॅट्रिक्स वॉरियर्सच्या स्वयंसेवकांनी फ्लॅश मॉबद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, देशभक्तीपर गीत अशा विविध गीतांमधून नागरिकांचे लक्ष वेधले व पुढे ‘मतदान कर…’ अशी साद देखील घातली. तसेच पथनाट्याद्वारे मतदान का आवश्यक आहे, हे देखील पटवून दिले.

मॅट्रिक्स वॉरियर्स संस्थेतर्फे पथनाट्याचे लेखन नंदिनी मेनजोगे यांनी केले तर संकल्पना आदित्य खोब्रागडे यांची होती. संस्थेचे आकाश निखाडे, सर्वेश हरडे, सुजाता कावरे, संजना मानवटकर, कुणाल पवार, आदर्श दुधनकर, नयन हावरे, प्रशांत बेलसरे, पलाश हेडाऊ, रोशन वांढरे, जान्हवी वांढरे, वृषाली भानारे, साक्षी सारडा, निखिल दुधनकर, आचल पौनीकर, विनीत चांडक, गौरी रुद्राकर, चेतन दुधनकर, मोहिनी जंगले, समीक्षा जंगले या स्वयंसेवकांनी पथनाट्य व फ्लॅश मॉबमध्ये सहभाग नोंदविला. नागरिकांनी देखील या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शहरातील ५० रस्त्यांचे डांबरीकरण, मनपा हॉट मिक्स प्लांट द्वारे रस्ते दुरूस्ती कार्य प्रगतीपथावर

Wed Apr 3 , 2024
नागपूर :- शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासह शहराच्या सौदार्यीकरणच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका विशेष कार्यरत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या हॉट मिक्स प्लांटद्वारे शहरातील ४९ रस्त्यांचे संपूर्ण डांबरीकरण व दुरुस्तीचे गुणवत्तापूर्ण कार्य केल्या जात आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हॉट मिक्स प्लांट विभाग नियोजनबद्ध पध्दतीने गुणवत्तापूरक कार्य करीत आहे. मनपा हॉट मिक्स […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights