शहरातील ५० रस्त्यांचे डांबरीकरण, मनपा हॉट मिक्स प्लांट द्वारे रस्ते दुरूस्ती कार्य प्रगतीपथावर

नागपूर :- शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासह शहराच्या सौदार्यीकरणच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका विशेष कार्यरत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या हॉट मिक्स प्लांटद्वारे शहरातील ४९ रस्त्यांचे संपूर्ण डांबरीकरण व दुरुस्तीचे गुणवत्तापूर्ण कार्य केल्या जात आहेत.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हॉट मिक्स प्लांट विभाग नियोजनबद्ध पध्दतीने गुणवत्तापूरक कार्य करीत आहे. मनपा हॉट मिक्स प्लांट विभागाने शहरातील ४९ रस्त्यांवर संपूर्ण डांबरीकरण करुन रस्ते खड्डे मुक्त करण्यात आले आहे. तसेच धंतोली झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक ३५ येथील ५० वा रस्ता चिंचभवनघाट या डीपी रोडचे कार्य करण्यात येत आहे.

मनपा हॉट मिक्स प्लांट विभागाद्वारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणारा विना फॅशन ते शरद देशकर श्रीराम नगर, वर्धा रोड, आटा चक्की ते स्पंदन ब्युटी पार्लर श्रीराम नगर वर्धा रोड, प्रफुल टेंभरे ते यशोदा शाळा, यशोदा नगर रस्ता, हिंगणा रोड ते संत गाडगे नगर रस्ता, जैस्वाल गुरुकृपा फेब्रीकेशन ते संस्था नगर बुध्द विहार दाते ले आऊट रस्ता, शिवणगाव घाट ते सी.आर.पी.एफ गेट पर्यत, शिवनगाव रस्ता, शास्त्री ले आऊट गार्डन ते शितला माता मंदिर, सुभाष नगर रस्ता, धरमपेठ झोन अंतर्गत वैद्य ते पंचमुखी हनुमान मंदिर, गायत्री कॉलनी, हजारी पहाड रस्ता, बाटा शोरुम ते नारंग टावर सिव्हील लाईन रस्ता, स्मशान घाट ते दाभा चौक रस्ता, दुर्गा मंदीर ते पांडे ऑप्टीकल ते नाला पर्यत यशवंत स्टेडीयम रस्ता, लोहापूल शनी मंदिर ते आनंद टाकीज चौक रस्ता, यशवंत स्टेडीयम समोर कॅफे हाऊस ते धंतोली झोन समोर रेल्वे पुलीया रस्ता हनुमान नगर झोन अंतर्गत येणारा वंजारी नगर पाणीटंकी समोर रस्ता, तारा औषधालय ते मेडिकल चौक समोर रस्ता, धंतोली झोन अंतर्गत येणारा चिंचभवन नारायण कॉलेज समोर, डावीकडील डी.पी. रोड वर्धा रोड, चिंचभवन नारायण कॉलेज समोर, उजवीकडील शाळेचा रस्ता वर्धा रोड, नेहरूनगर झोन अंतर्गत येणारा ॲडव्होकेट ते रोशन किराणा स्टोअर्स, सिंधीबन, ताजबाग रस्ता, पठाण ते AZ/Villa/A, सिंधीबन, ताजबाग रस्ता, सतरांजीपूरा झोन अंतर्गत येणारा अलहयात ते नुर शांती नगर रस्ता, नुर ते ताज विला, शांती नगर रस्ता, इस्माईल खान यांचे घरासमोर, शांतीनगर रस्ता, शाहु फरसान ते बाबा मस्तान दर्गा, दहिबाजार रस्ता, दहीबाजार पुलीया इतवारी RUB ते पदमप्रभु किराणा, लालगंज रस्ता दहीबाजार RVB लकी फुट वेअर ते महालक्ष्मी ज्वेलर्स रस्ता इतवारी रेल्वे स्टेशन गेट ते ताराचंद डेअरी रस्ता, लकडगंज झोन अंतर्गत मा भगवती फर्निचर ते सॅरॉमिक लि. भरणी कारखाना रस्ता, झाडे ते गुप्ता, दुर्गा नगर, रस्ता, मोनु किराणा ते फाये दुर्गा नगर रस्ता, देवीदास मनोहर हुडके ते फातुजी मुडवे ते पुरुषोत्म गडीकर ते हितेश पंताग, दुर्गा नगर पारडी रस्ता, साधना येरपुडे ते काळे ते गितादेवी ते मामेश्वरी, कटरे सोसायटी, दुर्गा नगर, पारडी रस्ता, सचिन साहारे ते गोविंद कबे, दुर्गा नगर, पारडी रस्ता, ताराबाई पराते ते अनिल बांते, भांडेवाडी (डवळेवाडी) रस्ता, सागर ते फाये, दुर्गा नगर, पारडी रस्ता, वंजारी ते रघुविर सिंग, दुर्गा नगर, पारडी रस्ता, कुर्गे ते रमाशंकर गुप्ता, दुर्गा नगर, पारडी रस्ता, अशीनगर झोन अंतर्गत येणारा काशमीर गल्ली, गार्डन जवळ रस्ता, गुरुद्वारा ते ढील्लो बाबा दीप सींग नगर रस्ता, प्लॉट न. D23, नुरी कलेक्शन महेश नगर/शांतीनगर, महादेव मेश्राम ते अरोरा यांच्या घरापर्यत, बाबदिपसिंग नगर रस्ता, मंगळवारी झोन अंतर्गत येणारा माऊली मंदिर ते गाठीबांधे यांचे घरापर्यत, गणपती नगर रस्ता, ज्वाला मंदीर ते शुक्ला पोलीस लाईन टाकळी रस्ता, पोलीस स्टेशन ते रामदेवबाबा कॉलेज रस्ता, विदर्भ टायर ते मनपा बनाईत शाळा, टेकानाका रामनगर ग्रिनपार्क श्री. आर. डी. गोपलानी ते मनिष सालवे यांचे घरापर्यत रस्ता, बुलचंद खुशलानी यांचे घरापासुन ते श्री. माखीजा शेख हाऊस, राजनगर रस्ता, मिश्रा किराणा ते वामण टी सेंटर दुर्गा मंदिर छावण रस्ता, पासपोर्ट ऑफीस ते घोष यांचे घरापर्यत मनस्वर कॉलनी रस्ता,आदी रस्त्यांचे दुरुस्ती करण्यात आली आहे.

विभागाचे कार्यकारी अभियंता अजय डहाके यांनी सांगितले की, मनपा हॉट मिक्स प्लांटद्वारे एकंदरीत ८२५० मीटर लांबीचे ४२०९६ चौ. मी. डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पुढील आठवडयात टाटाकंपनीचे ५ नग नवीन टिप्पर्स देखील हॉट मिक्स प्लांट विभागाला प्राप्त होणार असून, RTO प्रक्रियेअंतर्गत हस्तांतरीत होऊन विभागीय वाहनांच्या ताफ्यात येणार आहे. याशिवाय नवीन आर्थिक सत्रात नवीन हॉट मिक्स प्लांटच्या उभारणी व यंत्रसामुग्री खरेदी करीता सन२०२४-२५ या वर्षाकरिता चार कोटी रुपयांची तरतुद मनपाच्या अंदाजपत्रकात करण्यात आलेली असल्याचे या प्रकरणी खरेदी प्रक्रिया देखील विभागातर्फे लवकरच सुरु करण्यात येणार आहे. कार्यकारी अभियंता अजय डहाके यांनी या कामाचे श्रेय सर्व स्थापत्य व यांत्रिकी विषयक वरिष्ठ-कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या एकत्रित समन्वयाला देत, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, खरेदी समिती व मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांचे आभार व्यक्त केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विवाह मंडपातच वधू-वराकडून मतदानाची शपथ

Wed Apr 3 , 2024
– नवजीवनाचे पहिले पाऊल सोबतीने मतदानाचा निश्चय करून पुणे :- विवाहाची मिरवणूक निघालेली…फेटे बांधलेले वराती लग्नासाठी निघालेले…सनईच्या स्वरात सर्वांचे मंडपात दिलखुलास स्वागत… आणि लग्नघटीका समिप आली असताना वर-वधूंनी नवजीवनात प्रवेश करताना पहिले पाऊल मतदानाचा संकल्प करून टाकले. त्यांनी इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. विवाहात ज्येष्ठांनी आशीर्वाद देतानाच थोरा मोठ्यांचा मान ठेवण्याचा, सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा संदेश दिला. त्याचे पालन करण्याचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights