नागपूर :-भक्तांना सांगण्याचे तात्पर्य म्हणजे नागपूर शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होत असल्या कारणास्तव सर्व प्रकारे सकाळच्या वेळी मार्ग बंद राहतील. व रविवार दि. 11 डिसेंबरलाच संकटी चतुर्थी असल्याने मंदिरात भक्तांची गर्दी होत असते. त्यामुळे रेल्वे स्टेशन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होत आहे. म्हणून त्या सुमारास सकाळी ९ च्या दरम्यान कडेकोट बंदोबस्त असल्याने मार्ग बंद राहते. त्या कारणास्त भाविक भक्तांनी नोंद घ्यावी. आणि सकाळी 11 च्या नंतरच भक्तांनी मंदिरात प्रवेश घ्यावा व दर्शन घ्यावे. आपण सर्व भक्तांना होणाऱ्या गैरसोई बद्दल संस्था दिलगीर आहे. असे गणेश मंदिर टेकडी नागपूरचे सचिव एस.बी. कुलकर्णी यांनी एका प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
@ फाईल फोटो