बालविवाह थांबविण्यासाठी सजग राहा, हेल्प लाईन १०९८ वर संर्पक साधण्याचे प्रशासनाचे आवाहन

– अक्षय तृतीयेच्या दिवशी राहणार विशेष लक्ष

गडचिरोली :- अक्षय तृतीया हा महत्वाचा मुहुर्त असल्याने या मुहुर्तावर सामुदायिक व एकल विवाह समारंभ आयोजित कले जातात. यामध्ये बालविवाहाचे प्रमाण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग नवी दिल्ली यांच्याकडुन अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर होणारे बालविवाह रोखण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडुन निर्देश प्राप्त झाले आहेत.

दि. १० मे २०२४ रोजी अक्षय तृतीया आहे या दिवशी संभावित बालविवाहाच्या घटना थांबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियमातील तरतुदीनुसार बालविवाह रोखण्यासाठी तयारी केली. १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने अल्पवयीन वधुशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि १ लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. जाणीवपुर्वक बालविवाह ठरविल्यास, त्यासाठी सोहळा पार पाडल्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती तसेच संबधित वर वधु यांचे आई वडील किंवा पालक, अन्य नातेवाईक व मित्रपरिवार, धार्मीक स्थळाचे विश्वस्त, फोटोग्राफर, प्रिंटीग प्रेस, वाजतंत्री, लग्न सभागृहाचे व्यवस्थापक, कॅटरिंग अशा सर्वांनी हा विवाह घडविल्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाही, जे अशा विवाहात सामील झाले त्या सर्वांना दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपये पर्यंत दंड किवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बालविवाह बाबत आपल्याला माहिती मिळाली तर जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चॉईल्ड हेल्प लाईन १०९८ गडचिरोली या नंबरवर संर्पक साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, प्रकाश भांदककर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उष्माघात प्रतिबंधासाठी वाटर बेल संकल्पना राबवा - आयुषी सिंह

Fri May 10 , 2024
– दर तासाला किमान 1 ग्लास पाणी घ्या गडचिरोली :- जिल्ह्यात उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा आणि त्यामुळे उद्भ वणा-या उष्माघातजन्य आणि तद्अनुषंगिक आजारांचा सामना करावा लागत असून उष्माघात प्रतिबंधासाठी ‘वाटर बेल’ (Water Bell) संकल्पनेचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे. उष्णतेच्या लाटेमध्ये प्रामुख्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण उत्तम ठेवणे महत्वाचे आहे. यासाठी प्रत्येक प्रौढ व्यक्तीने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com