– विविध मुद्द्यांवर आमदारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न पण मेळ लागेना !
– विकास कामांच्या सपाट्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण !
मोर्शी :- मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार देवेंद्र भुयार यांनी पहिल्याच पंचवार्षिक मध्ये 4000 कोटींपेक्षा जास्त रुपयांची विकास कामे मतदार संघात केली. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघातून जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. परंतु विरोधकांना पचनी पडत नसल्यामुळे चौफेर बाजूने मिळेल त्या मुद्द्यावर टीकाटिपणी सुरू केली आहे. परंतु मोर्शी वरुड मतदार संघातील जनता जनार्दन मोठ्या संख्येने आणि अतिशय उत्साहाने आमदार आपल्या दारी ग्रामविकास संवाद दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून उत्साहाने सहभागी होत आहेत.
आमदार देवेंद्र भुयार यांनी पहिल्याच प्रयत्नात प्रत्येक गावांकरिता विकास कामाचा सपाटा लावल्याने नागरिकांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे. ग्रामीण भागामध्ये विविध प्रकारची सार्वजनिक सोयी सुविधा, शेत रस्ते, सार्वजनिक इमारती, पाणीपुरवठा योजना, शैक्षणिक सोयी सुविधा, वाचनालये, जिमखाने, विविध खेळाची मैदानी, वैयक्तिक लाभाच्या योजना , नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, जलसिंचनाच्या अपूर्ण प्रकल्पांची कामे, जलसंधारणाची कामे, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना, तलाठी कार्यालय, विविध रुग्णालय इमारती बांधकाम, ग्रामीण रस्त्यांची सुधारणा इत्यादी विविध स्वरूपांच्या कामांना कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून ग्रामीण भागातील जनता जनार्दनानकरिता सोयी सुविधा उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून आमदार देवेंद्र भुयार यांनी अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात लोकप्रियता प्राप्त केली आहे. त्यामुळे विरोधकांचे चांगलेच दिसून येत आहे. अत्यंत शिल्लक मुद्द्यांवरून आमदार देवेंद्र भुयार यांना वेठीस धरण्याचा विरोधक प्रयत्न करीत आहे. परंतु आमदार देवेंद्र भुयार नेहमीच आपल्या निर्णयाक भूमिकेवर ठाम राहत असून विरोधकांच्या कोणत्याही टीकेला बळी न पडता नित्य नियमाने आपले काम करीत राहतात. विरोधकांच्या टीकेला कोणतेही प्रत्युत्तरणात दिल्याने विरोधकांना चांगलीच चपराक बसून स्वतःच जनतेपुढे दुतोंडी ठरत असल्याचे चित्र आहे. मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार देवेंद्र भुयार वर्षाचे 365 दिवस न थांबता न थकता मतदार संघासाठी वाटेल ते करण्यास तत्पर असतात. त्यामुळे मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील असंख्य चाहता वर्ग आहे.
आमदार देवेंद्र भुयार यांच्या लोकप्रियते सोबतच त्यांच्या सहचारिणी डॉक्टर मोनाली भुयार यांनी सुद्धा संपूर्ण मतदारसंघात महिलांकरिता हिरकणी महिला संघाच्या माध्यमातून बचत गटांकरिता विविध उपक्रम राबवून सातत्याने महिलांना मार्गदर्शन करीत आहेत. पहिल्यांदाच लाखो महिलांना हिरकणी महिला संघांच्या सहाय्याने एकजुट करून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे ध्येय बाळगून करीत असलेली वाटचाल ग्रामीण भागातील महिलांना प्रेरणादायक ठरत असल्याने विरोधकांनी त्यांचे वर सुद्धा टीका टिपणी सुरू केल्याची दिसून येते.
परंतु संपूर्ण हिरकणी महिला संघातील सदस्य टीका टिपणींना न घाबरता आपली एकजुटीची उमेद कायम ठेवून मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार स्वयंप्रेरणा आणि स्वबळावर कसे सक्षम होता येईल यावर भर देत आहेत. अल्पावधीतच डॉक्टर मोनाली भुयार यांनी मतदारसंघात लोकप्रियता मिळविल्याने विरोधकांचे चांगलेच धाबे दनानले आहेत.
आमदार आपल्या दारी व ग्राम विकास संवाद दौऱ्या निमित्ताने प्रत्येक ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यक्रमात दिसून येते. संवाद दौऱ्यामध्ये भूमिपूजन लोकार्पण व मंजुरी आदेश प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम घेण्यात येत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक मतदारांकरिता व आभाळ वृद्धांकरिता शासन कटीबद्ध असून आमदार आपल्या दारीच्या माध्यमातून आमदार देवेंद्र भुयार शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवीत आहेत. मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी हजारो वृद्ध महिला भगिनींना संजय गांधी श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळवून देऊन वृद्धापकाळात जगण्याची एक नवी उमेद कायम केली आहे. त्यामुळे वडीलधारी मतदारांमध्ये सुद्धा अत्यंत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरूड मोर्शी विधानसभा युवक अध्यक्ष ऋषीकेश राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले.