मोबाईलमुळे जग जवळ आले पण नाती दुरावली..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 7 :- आज आधुनिकतेच्या युगात मोबाईल क्रांतीमुळे जग जवळ आले आहे परंतु याच मोबाईल संस्कृतीमुळे मात्र माणसा -माणसातील नाते दुरावत चालले असल्याची उदाहरणात्मक प्रचिती कामठी बस स्टँड चौकात दिसून आली.

मोबाईलमुळे प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत .मोबाईलवर संभाषणाला भरपूर वेळ आहे परंतु माणसांना एकमेकाजवळ बसूनही बोलायला तेवढा वेळ मिळताना दिसून येत नाही.मोबाईल,कॉम्पुटर आणि दुरचित्रवाणीमुळे नात्यातील जिव्हाळा दुरावला असल्याचे विचित्र चित्र आज सगळीकडेच दिसत आहे.नात्यातील ओलाव्यासह या मोबाईल संस्कृतीने कॅमेरा, घड्याळ, टॉर्च, केल्क्युलेटर,रेडिओ या वस्तूचे महत्व देखील कमी केले आहे.

..आधी विविध धार्मिक सोहळे तसेच घरगुती छोट्या मोठ्या समारंभाचे फोटो कॅमेऱ्याने टिपून जतन करून ठेवले जायचे परंतु आता मोठ्या मेगापिक्सलचे मोबाईल हातात आल्यापासून क्यामेरा हद्दपार झाला आहे.आता तर छोट्या प्रासंगिक कार्यक्रमाच्या पत्रिका न छापता मोबाईलवरून एसएमएस किंवा व्हाट्सएप द्वारे त्या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठविले जात आहे.मोबाईलमुळे आता पत्रलेखनही कमी झाले आहे त्यामुळे आता थोर मोठ्याना लिहायच्या पत्रातील मजकूर सुदधा आजच्या पिढीला माहीत नसल्याचे दिसून येत आहे.

जो तो एकूणच मोबाईलमध्ये मान वाकवून असल्याने घराघरातील संवादही हरवत चालले आहे. अगदी लहानपणापासूनच मोबाईल हातात आल्याने लहानमुले मैदानी खेळापासून दुरावली आहेत .मानवी जिवन क्रांती करून गतिमान बनविणे आवश्यक असले तरी घरातल्या नात्यापासून आपण दूर होणार नाही याची काळजी सर्वांनीच घेणे अत्यंत गरजेचे आहे हे देखील तेवढेच सत्य आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पोरवाल महाविद्यालयात सेठ केसरीमल पोरवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वादविवाद स्पर्धेचे आयोजन..

Fri Oct 7 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी – येथे 7 ऑक्टोबर 2022 रोजी सेठ केसरीमल पोरवाल यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नूतनीकरण केलेल्या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. परिणयजी फुके, विधान परिषद , सदस्य, महाराष्ट्र राज्य,हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोककुमार भाटिया, विकास निर्देशक, शिक्षण प्रसारक मंडळ कामठी हे होते. विजयकुमारजी शर्मा, सचिव, एस.पी.एम., […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!