मोबाईलमुळे जग जवळ आले पण नाती दुरावली..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 7 :- आज आधुनिकतेच्या युगात मोबाईल क्रांतीमुळे जग जवळ आले आहे परंतु याच मोबाईल संस्कृतीमुळे मात्र माणसा -माणसातील नाते दुरावत चालले असल्याची उदाहरणात्मक प्रचिती कामठी बस स्टँड चौकात दिसून आली.

मोबाईलमुळे प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत .मोबाईलवर संभाषणाला भरपूर वेळ आहे परंतु माणसांना एकमेकाजवळ बसूनही बोलायला तेवढा वेळ मिळताना दिसून येत नाही.मोबाईल,कॉम्पुटर आणि दुरचित्रवाणीमुळे नात्यातील जिव्हाळा दुरावला असल्याचे विचित्र चित्र आज सगळीकडेच दिसत आहे.नात्यातील ओलाव्यासह या मोबाईल संस्कृतीने कॅमेरा, घड्याळ, टॉर्च, केल्क्युलेटर,रेडिओ या वस्तूचे महत्व देखील कमी केले आहे.

..आधी विविध धार्मिक सोहळे तसेच घरगुती छोट्या मोठ्या समारंभाचे फोटो कॅमेऱ्याने टिपून जतन करून ठेवले जायचे परंतु आता मोठ्या मेगापिक्सलचे मोबाईल हातात आल्यापासून क्यामेरा हद्दपार झाला आहे.आता तर छोट्या प्रासंगिक कार्यक्रमाच्या पत्रिका न छापता मोबाईलवरून एसएमएस किंवा व्हाट्सएप द्वारे त्या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठविले जात आहे.मोबाईलमुळे आता पत्रलेखनही कमी झाले आहे त्यामुळे आता थोर मोठ्याना लिहायच्या पत्रातील मजकूर सुदधा आजच्या पिढीला माहीत नसल्याचे दिसून येत आहे.

जो तो एकूणच मोबाईलमध्ये मान वाकवून असल्याने घराघरातील संवादही हरवत चालले आहे. अगदी लहानपणापासूनच मोबाईल हातात आल्याने लहानमुले मैदानी खेळापासून दुरावली आहेत .मानवी जिवन क्रांती करून गतिमान बनविणे आवश्यक असले तरी घरातल्या नात्यापासून आपण दूर होणार नाही याची काळजी सर्वांनीच घेणे अत्यंत गरजेचे आहे हे देखील तेवढेच सत्य आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com