पोरवाल महाविद्यालयात सेठ केसरीमल पोरवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वादविवाद स्पर्धेचे आयोजन..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी – येथे 7 ऑक्टोबर 2022 रोजी सेठ केसरीमल पोरवाल यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नूतनीकरण केलेल्या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. परिणयजी फुके, विधान परिषद , सदस्य, महाराष्ट्र राज्य,हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोककुमार भाटिया, विकास निर्देशक, शिक्षण प्रसारक मंडळ कामठी हे होते. विजयकुमारजी शर्मा, सचिव, एस.पी.एम., कामठी , सीईओ डॉ. एम.एन. घोषाल, प्राचार्य डॉ. विनय चव्हाण, समन्वयक डॉ. मनीष चक्रवर्ती हेही व्यासपीठावर उपस्थित होते. पाहुण्यांनी स्व.सेठ केसरीमलजी पोरवाल यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. प्राचार्य डॉ. विनय चव्हाण यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात वेगाने होत असलेल्या प्रगतीची रूपरेषा सांगितली. सीईओ डॉ एम.एन. घोषाल यांनी पोरवाल महाविद्यालयाच्या वादविवाद स्पर्धेच्या इतिहासावर सविस्तर विवेचन केले. प्रमुख पाहुणे, श्री.परिणय फुके, विधान परिषद,सदस्य , महाराष्ट्र राज्य यांनी शैक्षणिक सुधारणांच्या आवश्‍यकतेवर भर दिले आणि याप्रसंगी वाद -विवाद स्पर्धा आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात अशोककुमार भाटिया यांनी उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या निकडीवर भर दिले आणि विद्यार्थ्यांना राष्ट्र उभारणीत सहभागी होण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी उत्कृष्ट शैक्षणिक प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. बी.ए.मध्ये सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल जी.एल. पारस्कर मेमोरियल सुवर्णपदक कु.हुस्न आरा मोहम्मद जुल्करनैन यांना अनिवार्य इंग्रजी या विषयात तर बी ए तृतीय वर्षमध्ये सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल कुकडे मेमोरियल सुवर्णपदक, समाजशास्त्र (मराठी माध्यम)  गौरव कंभाळे यांना दिले गेले. कनिष्ठ महाविद्यालयातील हर्षिता शर्मा, तौफिक सना सनाउल्ला, मुस्कन द्विवेदी, विवेक नानकानी, रेश्मा कोडवते आणि फातेमा शेख यांनाही या कार्यक्रमात पारितोषिक देण्यात आले. यावेळी ‘केसरी’ या महाविद्यालयीन वार्षिकांकाचे प्रकाशनही करण्यात आले आणि वार्षिकांकाच्या  मुख्य संपादक डॉ.हाश्मी यांनी केशरीच्या प्रकाशनाबद्दल थोडक्यात माहिती दिली. स्व.सेठ केसरीमलजी पोरवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्य स्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वादविवाद स्पर्धेत विविध महाविद्यालयातील एकूण 36 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चर्चेचा विषय होता, या सभेच्या  मते: “स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांत भारत हा खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर राष्ट्र बनला आहे.” या वाद-विवाद स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रवीण हांडा, सेवानिवृत्त प्राध्यापिका इंग्रजी विषय, एस.के. पोरवाल ज्यु. कॉलेज,  टिकाराम  साहू, उपसंपादक, दैनिक भास्कर, नागपूर, डॉ. अमृता इंदूरकर, समीक्षक,कवयित्री व भाषातज्ज्ञ ही मंडळी होती. एस.पी.एम.चे सदस्य डॉ.अनिल मंगतानी, डॉ.परिणिता फुके, नागोरावजी साबळे, उपप्राचार्य डॉ.रेणू तिवारी, उपप्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय, प्रा.सुनीता भौमिक, पर्यवेक्षक डॉ.एस.एन. अग्रवाल, कुलसचिव स्वप्नील राठोड, सी डी सी सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ.संजीव शिरपुकर, डॉ.रेणुका रॉय, डॉ.जी.आर. हाश्मी व आदमाने यांनी केले. तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे समन्वयक उपप्राचार्य डॉ.मनिष चक्रवर्ती यांनी मानले.

Next Post

सत्रापुर रोड येथे पंचशिल बौध्द विहार व मांग-गारोडी समाज व्दारे धम्म प्रेमीना भोजन वितरण..

Fri Oct 7 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – सम्राट अशोक विजय दिवस व धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्य नागपुर जबलपुर राष्ट्रीय महा मार्गावरील कन्हान नदी पुल सत्रापुर रोड जवळ पंच शिल बौध्द विहार व मांग-गारोडी समाज सत्रापुर व्दारे धम्म प्रेमींचे स्वागत करून भोजन वितरण करण्यात आले. बुधवार (दि.५) ला विश्वविजेता सम्राट अशोक विजय दिवस व धम्मचक्र परिवर्तन दिवसा निमित्य पंचशिल बौध्द विहार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com