लेदर बॉल क्रिकेटमध्ये डीएसए अजिंक्य, खासदार क्रीडा महोत्सव : लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी एचक्यूएमसी संघाचा पराभव करीत डीएसए संघ अजिंक्य ठरला.

डब्ल्यूसीएल मैदानावर लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत डीएसए संघाने एचक्यूएमसी संघाला ५२ धावांनी मात दिली. डीएसए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत निर्धारित १० षटकांमध्ये ४ बाद १२४ धावा काढल्या. संघाच्या सचिन कटारियाने अवघ् २१ चेंडूंमध्ये ५५ धावांची अर्धशतकी खेळी करीत संघाचा धावफलक वाढविण्यात मोठे योगदान दिले. संजोग बिनकर (२१) आणि अमोल चिंते (१६) यांनी दमदारनाबाद खेळी केली. एचक्यूएमसी संघाकडून निर्मलने २ तर अमित यादव आणि रवींद्र पूनीया यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. इतर गोलंदाजांना मात्र यश आले नाही.

प्रत्युत्तरात मैदानात उतरलेला एचक्यूएमसी संघ डीएसए संघाच्या गोलंदाजांच्या भेदक मा-यापुढे फारशी कामगिरी करू शकला नाही. अवघ्या ७.४ षटकांतच संपूर्ण संघ ७२ धावांत गारद झाला. डीएसएच्या अनूज वझलवारने अवघ्या १.४ षटकांत ९ धावांच्या मोबदल्यात ४ गडी बाद करून संघाच्या विजयाचा पाया रचला. कर्णधार अमित पौनीकर आणि विकी यादवने प्रत्येकी २ तर शैलेश हर्बडे आणि अमोल चिंतेने प्रत्येकी १ गडी बाद केला. एचक्यूएमसी संघाचा कर्णधार रेश कुमारने (२५) आणि सूर्यवीर (१२) वगळता अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या देखील गाठता आली नाही.

विजेत्या डीएसए संघाला ३१ हजार रुपये रोख पुरस्काराने गौरविण्यात आले. डीएसएच्या सचिन कटारियाला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

NewsToday24x7

Next Post

श्रीराम मंदिर में हुए समारोह में सनातन संस्था की आध्यात्मिक उत्तराधिकारिणी द्वय की वंदनीय उपस्थिति

Tue Jan 23 , 2024
– रामलला का पुनः राम मंदिर में प्रतिष्ठित होना, रामराज्य की शुरुवात ! – श्रीसत्शक्ति बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था अयोध्या :- ‘श्रीरामजन्मभूमि हेतु 500 वर्षाें के प्रदीर्घ संघर्ष के उपरांत रामजन्मभूमि मुक्त हुई और आज हम साक्षात प्रभु श्रीरामचंद्र के भव्य राम मंदिर की निर्मिति होकर रामलला की प्राणप्रतिष्ठा का समारोह देख रहे हैं, यह सनातन हिन्दू धर्मियों के लिए […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com