नागपूर :- उत्तर नागपूर मध्ये जनते व विद्यार्थ्यांचा मार्गदर्शनासाठी बांधण्यात आलेल्या कामठी रोड वरिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर चे उदद्याटन होऊन आता फक्त 3 महिने झाले आहे परंतु पहिल्याच पावसात करण्यात आलेल्या बांधकामाचा दर्जा दिसुन आलेला आहे. आतापर्यंत झालेले काम हे अतिशय निकृष्ठ दर्जाचे असुन समोर आलेल्या छायाचीत्रांमध्ये हे उजागर झाले आहे की, बांधकामात निष्काळजीपणा आणुन काम करण्यात आले आहे. यावरून असे निदर्शनास येते की, उत्तर नागपूर सोबत सावत्रव्यवहार करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरशी लोकांच्या भावना जुळलेल्या आहे. त्यामुळे याची ही अवस्था पाहुन आम्हाला फार जास्त दु:ख झालेले आहे. या विषयी तक्रार घेवून सभापती, नागपूर सुधार प्रन्यास यांच्या कडे तक्रार करण्यात आली असुन कंत्राटदारावर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी बाबतचे पत्र हे सभापती यांना देण्यात आले आहे व या विषयावर लक्ष देवून योग्य कार्यवाही करुन यावर लवकर निर्णय घेण्यात यावा. असेही सांगण्यात आले.
सदरच्या शिष्टमंडळामध्ये उत्तर नागपुर युवक काँग्रेस अध्यक्ष नीलेश खोबरागड़े, चेतन तरारे, सचिन वासनिक, राकेश इखर, आकाश इंदुरकर, पलाश लिंगायत, अनिकेत चिमोटे, अभिषेक धमेरिया हे उपस्थित होते.