डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय परिषद व्दारे शिक्षण सभापती भारती पाटील हिरकणी पुरस्काराने गौरव

कन्हान : – डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परि षद व्दारे जागतिक महिला दिना निमित्त राज्य स्तरावर प्रत्येक जिल्हयातील निवडक महिलेला हिरकणी पुर स्काराने सन्मानित करण्यात आले. याच उपक्रमातुन नागपुर जिल्यातील शिक्षण सभापती भारती पाटील  याना हिरकणी राज्य पुरस्काराने गौरवविण्यात आले.
           डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय परिषद व्दारे जागतिक महिला दिवसा निमित्य राज्य स्तरावर प्रति वर्षी क्रिडा, शिक्षण , समाजकारण, संशोधन, अर्थकारण, राजकारण, प्रशा सकीय सेवा आदि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांचा राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार प्रदान करून सन्मान केला जातो. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पु पाटील भोयर, प्रदेशाध्यक्ष  प्रदीप दादा सोळुंके, डॉ विलास पाटील, प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल, सतिश काळे, राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते, प्रदेश सचिव शेषराव येलेकर, नागपुर विभागीय अध्यक्ष संजय निंबा ळकर आदीच्या निवड समितीने राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार २०२२ करिता नागपुर जिल्हातील शिक्षण, अर्थ व क्रिडा सभापती सौ.भारती अनिल पाटील यांची निवड झाल्याने (दि.८) मार्च जागतिक महिला दिवसी त्याच्या कार्यालयात जाऊन शाल, श्रीफळ , पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन हिरकणी पुरस्काराने  गौरविण्यात आले. याप्रसंगी भारतीताई हयानी नारी शक्ति व तिच्या कलागुण, कौशल्य आणि तत्परता या वैशिष्टयावर महिला सर्व क्षेत्रात कार्यतत्पर आहेत. अशी स्त्रियांची महती आपल्या मनोगतातुन व्यक्त केली. तसेच त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन साथ देणाऱ्या सर्व भागिनींचे आभार व्यक्त केले. सदर स्वाग तात समीर शेख यांनी नारी शक्तिवर आधारित कविते तुन भारतीताई चा गौरव करण्यात आला. शेवटी साकोरे मॅडम हयांनी हिरकणी स्त्री विषयी महत्व सांगुन आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी डॉ पं दे राष्ट्रीय परिषद राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते, नागपुर विभा गीय अध्यक्ष संजय निंबाळकर, नागपुर जिल्हाध्यक्ष मेघराज गवखरे, नंदलाल यादव, कार्याध्यक्ष प्रविण मेश्राम, उपाध्यक्ष गजानन कोंगरे, संघटक अविनाश श्रीखंडे, लोकोत्तम बुटले, अतुल बालपांडे, सचिव विनोद चिकटे, योगेश कडु, सचिव सावनेर तालुका तुषार चापले, आकाश कोकोडे, जयसिंग पवार आदी संघटना पदाधिकारी व संध्या साकुरे, ताक्षी पाटील, रजनी बागडे शिक्षिका या सोहळ्यास प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सेंट्रल बँकेच्या एटीएम मधुन ९७,७४६ रू काढुन चोरी

Fri Mar 11 , 2022
कन्हान पोस्टे ला खाते धारक कामडे च्या तक्रारीने अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल.    कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस एक कि मी अंतरावर असलेल्या सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया एटीएम मधुन कोणीतरी अज्ञात आरोपी ने ९७,७४६ रूपये काढल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी च्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.       […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com