मंत्रिमंडळ उपसमितीकडून इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक कामाची पाहणी

स्मारकाच्या पादपीठाचे काम पूर्णत्वाकडे; पुतळ्याची प्रतिकृती लवकरच अंतिम होणार– धनंजय मुंडे

            मुंबई : मुंबईतील इंदूमिल परिसरात उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे सनियंत्रण व काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी नियुक्त मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड आदी मान्यवरांनी आज इंदूमिल स्मारक कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

या स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत्याच्या पादपीठाचे काम आता पूर्णत्वाकडे आले असूनपुतळ्याची 25 फुटी प्रतिकृती देखील लवकरच अंतिम करण्यात येणार आहेअसे म्हणत मंत्री मुंडे यांनी एकूण कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याच्या प्रतिकृतीची निर्मिती सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार व त्यांचे सहकारी करत आहेत. या प्रतिकृतीची मंत्रिमंडळाने नेमलेल्या उपसमितीने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे जाऊन नुकतीच पाहणी केली होती व त्या प्रतिकृती मध्ये काही बदल सुचवले होते.

त्यानुसार नवीन बदलांसह शिल्पकार अनिल सुतार यांनी प्रतिकृतीबाबतचे सादरीकरण केले. ही प्रतिकृती लवकरच अंतिम करण्यात येणार असूनत्यानंतर मुख्य पुतळ्याचे काम हाती घेण्यात येईलअसेही माध्यमांशी बोलताना मुंडे म्हणाले.

यावेळी मंत्री मुंडे यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाडसामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदमराज्यमंत्री संजय बनसोडेसामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगेसमाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरेशिल्पकार अनिल राम सुतारसमीर अनिल सुतारसंजय पाटीलआर्किटेक्ट शशी प्रभूइतिहासतज्ज्ञ डॉ. आर मालाणीसर जे.जे. स्कुल ऑफ आर्ट चे प्रा. विश्वनाथ सहारे आदी उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याने त्याला पूरक असा दर्जा सांभाळून काटेकोरपणे यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, हे स्मारक भविष्यात जगभरात ओळखले जावेयासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायीविषयतज्ज्ञसर्व पक्षीय नेते यांसह विविध मान्यवरांच्या सूचना लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री मुंडे यावेळी म्हणाले.

दरम्यान समुद्र किनारीचे वातावरणवातावरणातील होणारे बदलपावसाळ्यात कामाची गती आदी बाबी विचारात घेवून दैनंदिन कामांचा तक्ता बनवून त्यावर अंमल करावाअशा सूचना यावेळी मंत्री मुंडे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

तिलारी प्रकल्प मार्च २३ पर्यंत पूर्ण करा ; दुसऱ्या टप्प्यास १५ जूलै पर्यंत मंजूरी घ्यावी - पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Thu Jun 16 , 2022
मुबई : तिलारी प्रकल्पावर आधारित १८ गावे, वेंगुर्ला शहर व मार्गस्थ औद्योगिक क्षेत्र आणि पर्यटनस्थळांसाठी पाणी पुरवठा योजनेचे काम येत्या मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करा तसेच तिलारी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी १५ जुलै २०२२ पर्यंत मंजुरी घ्यावी, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात तिलारी प्रकल्पावर आधारित प्रकल्पाविषयी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!