संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 14 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठी च्या वतीने जयस्तंभ चौक स्थित परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अविनाश उकेश यांच्या हस्ते माल्यार्पण करून मानवंदना वाहण्यात आली. याप्रसंगी पोग्रैसिव्ह मुहमेन्ट चे राजेश गजभिये, प्रमोद खोब्रागडे , आशिष मेश्राम ,राजन मेश्राम विकास रंगारी, गितेश सुखदेवे, रायभान गजभिये, मनोज रंगारीव इतर, सार्वजनिक भिम स्मृती मंडळ कामठी चे वतीने . प्रमोद खोब्रागडे ,भिक्खू मेढे,. राजेश गजभिये ,रोहित महले,सुनील चव्हाण तसेच भारतीय संविधान गौरव समीती कामठी चे वतीने अध्यक्ष विकास रंगारी, अनिल पाटील, सुधा रंगारी, सुगत रामटेके व इतर उपस्थित होते.