मतदार नोंदणीचे काम युध्दस्तरावर करा –डॉ. विपीन इटनकर

– नवमतदारांची नोंदणीची जबाबदारी मुख्याध्यापकांनी स्विकारावी निवडणूक विषयक आढावा बैठक

नागपूर :– लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाची टक्केवारीत वाढ करणे फार महत्वाचे असून त्यादृष्टीने सर्वांनी मतदार नोंदणीचे काम युध्दस्तरावर करावे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने कामात गती आणा, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निवडणूक यंत्रणेस दिले.

सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदारनोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक व बीएलओंसोबत मतदार नोंदणी विषयक आढावा बैठक स्व. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रविण महिरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी यावेळीउपस्थित होते.           दिवाळी जवळ येत असून दोन महिन्यात मतदारनोंदणीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करा. 75 हजार नवमतदारांची नोंदणीचे उद्दिष्टपूर्ण करण्यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी जबाबदारी घेऊन नवमतदारांची नोंदणी करून घ्यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. पर्यवेक्षक व बीएलओंनी गांभीर्यानेयाकामात लक्ष देऊन मर्यादेत मतदार नोंदणी, मयत मतदारांचे नाव वगळणे व दुय्यम मतदार वगळणे, मतदार यादी शुध्दीकरण आदींसाठी नमुना क्र. 6, 7 व 8 भरुन घेण्यासाठी  पुन्हा  घरोघरी भेटी द्याव्यात. या कामात हयगय करणाऱ्यांवरकारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.निवडणूक विभागाच्या पत्रानुसार मयत मतदार वगळण्यासाठी मृत्यु प्रमाणपत्राची अट नाही. बीएलओंनी पंचनामा करावा किंवा त्यांच्या मयताच्या नातेवाईकांकडून नमुना भरुन घ्यावा.  निवडणूक पर्यवेक्षकांनी दररोज बीएलओकडून अहवाल घ्यावा,असेही त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘शिवमहापुराण’ कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Wed Oct 18 , 2023
नागपूर :- दिघोरी चौकात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला आज प्रारंभ झाला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमस्थळी भेट दिली. आमदार सर्वश्री मोहन मते, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके यांच्यासह देशातील विविध भागातून आलेले नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 उमरेड मार्गावरील दिघोरी चौक येथील बहादुरा फाटा टोल नाक्याजवळ असलेल्या 80 एकर परिसरात या प्रवचनाचे आयोजन करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com