नागपूर :- महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मुंबई च्या नागपूर खंडपीठ कार्यालयात शनिवार, 7 डिसेंबर 2024 रोजी लोक अदालत घेण्यात येणार असल्याची माहिती मॅटचे व्यवस्थापक पी.व्हि. बुलबुले यांनी दिली आहे.
शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर खंडपीठाच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील प्रशासकीय इमारत क्रमांक 1 च्या पहिल्या माळ्यावर स्थित कार्यालयात 7 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. संबंधित विभाग प्रमुखांनी उपस्थित राहण्याच्या सूचना बुलबुले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिल्या आहेत.