कृपासागर भोवते यांचा सेवानिवृत्तवर सत्कार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

भोवते सरांनी ५ वी च्या विद्यार्थ्याना संविधान पुस्तिका देऊन सामाजिक कार्याची सुरूवात.

कन्हान : – अखिलेश हायस्कुल साटक येथे २७ वर्ष ७ दिवस सेवा करून सेवानिवृत्त झाल्याने संस्था व हाय स्कुल व्दारे कृपासागर शामराव भोवते यांच्या समारंभासह शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त झाल्याने इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्याना संविधान पुस्तिका देण्याचे ठरवुन भोवते सरांनी सामाजिक कार्याची सुरूवात केली.
दिनांक ३० जुन २०२२ ला अखिलेश हायस्कुल साटक येथे २७ वर्ष ७ दिवस शिक्षक म्हणुन सेवाप्रदान करून सेवानिवृत्त झालेले कृपासागर शामराव भोवते नुकताच अखिलेश हायस्कुल साटक व्दारे संस्थेचे संस्थापक सचिव जयदासजी सोमकुवर यांचे हस्ते व संस्था अध्यक्षा सोमकुवर , संस्था सहसचिव अखिलेश सोमकुवर यांच्या प्रमुख उपस्थित समारंभासह भोवते यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कृपासागर भोवते सेवानिवृत्ती नंतर च्या काळात राजकीय व सामाजिक कार्यक्षेत्रात कार्य करण्याचे ठरविले असुन त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासा शिवाय पर्याय नसल्याचे मार्गदर्शनात सांगितले. तदंतर इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्याना संविधान पुस्तिका देण्याचे ठरवु न सामाजिक कार्याची सुरूवात केली. कार्यक्रमास अखिलेश हायस्कुल साटक चे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मुल्ला गावात भर पावसाळ्यात अग्नी तांडव..

Sun Jul 17 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान…जिवीत हाणी नाही देवरी अग्निसमकच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण गोंदिया – जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील मुल्ला गावात ऐकाच गावातील चार भावांच्या गोठ्याला भर वापसाळ्यात रात्री दरम्यान अचानक आग लागल्याने गावात हाहाकार माचला होता. तर वेळेवरच देवरी नगरंचायतच्या अग्निशमक वाहनाला पाचारन करत आगिवर नियंत्रन मिळविण्यात आला. मुल्ला येथिल येथील श्रीराम मुनेश्वर, विश्वनाथ मुनेश्वर, नारायन मुनेश्वर, संजय मुनेश्वर यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com