जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी संपन्न

भंडारा :- शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भंडारा येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी 2023 आयोजित करण्यात आलेली होती. याप्रसंगी भंडारा जिल्हयातील सर्व शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था त्याचप्रमाणे तंत्र माध्यमिक शाळा सहभागी झाल्या होत्या. जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनी कार्यकम संस्थेच्या प्राचार्या जे. व्हि. निंबार्ते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.

या कार्याकमाप्रसंगी अध्यक्षस्थानी व्हि. एम. लाकडे, जिल्हा व्यवसाय, शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी भंडारा, तर प्रमुख पाहुणे म्हणुन आर. एस. जाधव, प्राचार्य औ.प्र. संस्था साकोली, एन. डि. पिसे, प्राचार्या औ. प्र. संस्था पवनी, पि.बि. बेतावार सर्वसाधारण प्राचार्य औ. प्र. संस्था लाखनी, एस. व्हि. मलेवार प्राचार्य औ. प्र. संस्था मोहाडी, तर उद्घाटक म्हणून रामविलासजी सारडा अध्यक्ष भंडारा जिल्हा इंडस्ट्रियल असोसिएशन भंडारा, सोनू उके, जिल्हा कौशल्य व रोजगार उद्योजकता विभाग भंडारा उपस्थित होते.

उपस्थित पाहुणे व उद्घाटक मान्यवरांनी तंत्रज्ञान व त्याचे महत्व चालु स्थितीमध्ये व भविष्यात कशाप्रकारे उपयोग केल्या जाईल याबद्दल विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी सर्व सहभागी झालेले विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रासंबंधीत उत्कृष्ठ मॉडेल तयार केले होते. तंत्रप्रदर्शनीकरीता 8 शासकिय औ. प्र. संस्था, व 15 खाजगी औ. प्र. संस्थेने सहभाग नोंदविला असून एकुण 55 मॉडेल्स ठेवण्यात आलेले होते. तंत्रप्रदर्शनीमधील मॉडेल्स बघण्याकरीता सर्व शासकिय व खाजगी औ. प्र. संस्था तसेच इतर विद्यालयातील विद्यार्थी यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला.

जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनीत तिन गट करुन घेण्यात आले होते. यामध्ये अभियांत्रिकी गटास एकुण पाच पुरस्कार देण्यात आले. तर बिगर अभियांत्रिकी गटामध्ये एकुण दोन पुरस्कार देण्यात आले. तसेच इनोव्हेशन गटामध्ये तिन पुरस्कार देण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गुणवैभव' या व्यक्तीचरित्राचा "गुण वैभव " पुस्तकाचे प्रकाशन रविवारी

Sat Dec 23 , 2023
नागपूर :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर गेल्या तीन दशकांपासून विदर्भात सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. गेल्या तीन दशकात गुणेश्वर आरीकर यांनी अनेक सामूहिक विवाहाच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना सहाय्य केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे विदर्भात सर्व दूर त्यांनी कौतुक केले, त्यासाठी सोहळ्या आयोजित केले. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनात राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या खांद्याला खांदा लावून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com