गडचिरोली :- दिनांक १५/१२/२०२२ रोजी जिल्हा कृषि महोत्सव-२०२२ गडचिरोली कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी शुभम कोमरेवार, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, गडचिरोली यांनी शेतक-यांना शास्त्रोक्त पध्दतीने शेततलावात मत्स्यपालन व मुल्यवर्धीत पदार्थ विषयावर मार्गदर्शन केले.यावेळेस त्यांनी शेतीसोबतच शेततळ्यात मत्स्यपालन केल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असे प्रतिपादन केले. रोशन डागा, संचालक, रानवारा पर्यटन केंद्र, हिंगणघाट, जि. वर्धा यांनी कृषि पर्यटन विषयावर मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वर ताथोड, विषय विशेषज्ञ, (कृषि अभियांत्रिकि) कृ.वि.कें. सोनापुर, गडचिरोली यांनी कृषि यांत्रिकीकरण विषयावर मार्गदर्शन केले. डॉ.पवन पावडे, पशुविकास अधिकारी, अहेरी यांनी मुक्तसंचार गोठा व फायदे विषयावर मार्गदर्शन केले. डॉ.जिशांत नंदेश्वर, पशुविकास अधिकारी यांनी आधुनिक दुग्ध व्यवसाय विषयावर मार्गदर्शन केले. योगिता सानप , विषय विशेषज्ञ, (गृहविज्ञान ) यांनी भाजीपाला व फळे मुल्यवर्धीत पदार्थ विषयावर आभासी पध्दतीने शेतक-यांना मार्गदर्शन केले. आनंद गंजेवार, उपविभागीय कृषि अधिकारी, अहेरी यांनी काजु लागवड तंत्रज्ञान विषयावर मार्गदर्शन केले.आज दिनांक १५/१२/२०२२ रोजी जिल्हा कृषि महोत्सवाच्या चौथ्या दिवशी मोठ्यासंख्येने शेतकरी बंधु व भगिनीं, शाळेचे विद्यार्थी, नागरीक यांनी प्रदर्शनीला भेट देऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला. तसेच कृषि प्रदर्शनामध्ये उपस्थित आत्मा, माविम व उमेद यांच्या गटांकडुन मोठ्याप्रमाणात मुल्यवर्धीत पदार्थ व शेतमाल यांची विक्री झाली.