– ‘सुपर 75’ अंतर्गत JEE, NEET, NDA चे मोफत शिकवणी वर्ग
नागपूर :- नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्गत येणाऱ्या मनपा नेताजी मार्केट हिंदी प्राथमिक/माध्यमिक शाळा येथे शनिवार (6 ता.) रोजी शहराचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते ‘सुपर 75’ च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. ‘सुपर 75’ अंतर्गत मनपातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी JEE, NEET, NDA चे मोफत शिकवणी वर्ग घेण्यात येतात.
याप्रसंगी नागपूर महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजेंद्र पुसेकर, खाजगी शिक्षण वर्गाचे अध्यक्ष अंधारे, सहायक शिक्षणाधिकारी उपासे, नेताजी शाळेच्या मुख्याध्यापिका साधना सायम, शिकवणी वर्गाचे शिक्षक अब्दुल, रुईकर, मयुरी जैन,प्रकल्पाचे समन्वयक टेंभुर्णे यांच्यासह विद्यार्थी व पालक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शिकवणी वर्गासाठी लागणारे साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आले.
यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना दयाशंकर तिवारी म्हणाले की, नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना JEE, NEET, NDA ची मोफत कोचिंग सुपर 75 शिकवणी वर्गाअंतर्गत दिली जाते ही कौतुकासपात्र असलेली बाब आहे. विद्यार्थ्यांनी देखील याचा पुरेपूर लाभ घ्यावा. इतक्या दहावी मधील विद्यार्थ्यांनी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा. तसेच JEE, NEET, NDA ची मोफत शिकवणी मनपाच्या होतकरू विद्यार्थ्यांना प्राप्त झाल्यास विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर व संरक्षण दलात मोठे अधिकारी होतील अशी अपेक्षा दयाशंकर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली.
तर शिक्षणाधिकारी राजेंद्र पूसेकर म्हणाले की सुपर 75 शिकवणी वर्गामुळे महागड्या शिकवणी वर्गापासून वंचित राहणार नसून, मनपाचे विद्यार्थीही मनपाचे नाव उंचावेल अशी अपेक्षा ही शिक्षणाधिकारी पुसेकर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टेंभुर्णे यांनी केले.