रामकृष्ण शारदा मिशन शाळेत सक्षम टॅबचे वितरण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- इन्फोसिसच्या स्थानिक सीएसआर समूह ‘ प्रयत्न एक कोशिश ‘ ने डिजिटल साक्षरतेला चालना देण्यासाठी रामकृष्ण सारदा मिशन स्कूल, कामठी येथे स्प्रिंगबोर्ड प्लॅटफॉर्म सक्षम टॅबचे वितरण केले. नागपूरचे डीसी हेड तरंग पुराणिक यांनी यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी संबोधित केले आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांच्या दूरदृष्टीची माहिती दिली.

इन्फोसिस नागपूरचे संचालक, रचित भंडार यांनीही विद्यार्थ्यांना स्प्रिंगबोर्ड प्लॅटफॉर्म आणि त्याचे वैशिष्ट्य याविषयी विशद केले आणि विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केले, तर प्रयास एक कोशिशचे समन्वयक जयंत देशकर यांनी ग्रुपद्वारे आयोजित सामाजिक जबाबदारी उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी शाळेच्या सचिव अमोघप्राण माताजी यांनी रामकृष्ण सारदा मिशनची उद्दिष्टे आणि शाळेने श्री रामकृष्णाच्या शिकवणीतून विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेले मूल्य याविषयी विशद केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे दुष्परिणाम आणि स्वामी विवेकानंदांच्या शिकवणींद्वारे त्यावर मात कशी करता येईल यावर एक स्किट सादर केले. सुधा मूर्ती यांच्या जीवनकार्यावर विद्यार्थ्याचे भाषणही झाले. रामकृष्ण सारदा मिशनच्या सचिव राजश्री तेल्हारकर यांनी विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ सक्षम केल्याबद्दल इन्फोसिस टीमचे आभार मानले.

या समारंभाला रामकृष्ण सारदा मिशन शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि प्रयास एक कोशिश (इन्फोसिस नागपूर डीसी सीएसआर) स्वयंसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार दिन साजरा

Wed Feb 1 , 2023
गडचिरोली : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक दुर्लक्षित उष्णकटीबंधीय आजार दिन दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी संजय मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी, कुमार आशीर्वाद,सहाय्यक संचालक,आरोग्य सेवा (हिवताप) नागपूर,डॉ.श्याम निमगडे, जागतिक आरोग्य संघटना,सल्लागार नागपूर विभाग,डॉ. भाग्यश्री त्रीदेवी,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय जठार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ.सुनील मडावी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com