उधारीच्या वादातून तरुणाच्या पोटावर केला चाकूने वार..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 19 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भूषण नगर येथे उधारीचे पैसे मागण्याच्या वादातून आरोपीने जख्मि तरुणाला अश्लील शिवीगाळ देत पोटावर चाकू मारून गंभीर जख्मि केल्याची घटना गतरात्री साडे दहा दरम्यान घडली असून जख्मि चे नाव तस्लिम खान वय 20 वर्षे रा भूषण नगर कामठी असून रुग्णालयात उपचार घेत आहे यासंदर्भात फिर्यादीने स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी उमेरुद्दीन फैजुद्दीन अन्सारी वय 31 वर्षे रा कामगार नगर कामठी, सैय्यद अली मोहम्मद अली वय 31 वर्षे रा इस्माईलपुरा कामठी, एक 20 वर्षीय तरुण रा येरखेडा कामठी व अन्य साथीदार विरुद्ध भादवी कलम 307,504,34 अनव्ये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सदर जख्मि ने आरोपी कडून दीड लक्ष रुपये उधार घेतले होते त्यातील 85 हजार रुपये आरोपीस परत केले व उर्वरित रक्कम देणे बाकी असूनही उधारी चे रक्कम देण्यास नकार देत असल्याने झालेला शाब्दिक वाद हा विकोपाला गेल्याने आरोपितांनी सदर जख्मि तरुणाला अश्लील शिवीगाळ देऊन जीवानिशी ठार करण्याच्या उद्देशाने जख्मि तरुणांच्या पोटावर चाकू मारून जख्मि केल्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी कार्य करावे..

Sun Mar 19 , 2023
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  -प्रसिद्धी प्रमुखाच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन कामठी – चळवळीच्या माध्यमातून आपण पत्रकारांचे अनेक प्रश्न सोडविले. उर्वरीत प्रश्नांसाठी आपला संघर्ष सुरु आहे. पत्रकारांना न्याय हक्क मिळवून देणे हे आपले ध्येय आहे. पत्रकारांचे संघटन म्हणून आपण आज मराठी पत्रसृष्टीत प्रथम क्रमांकावर आहोत. बड्या वृत्तपत्रांचे धनदांडगे मालक व सरकार आपल्या विरोधात आहे, आपल्या संघटनेला चहुबाजुंनी कमकुवत करण्याचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com