वाहन चोरीचा गुन्हा करणाऱ्या आरोपीस अटक, एकूण ८ गुन्हे उघडकीस

नागपूर :- पोलीस ठाणे प्रतापनगर हहीत, प्लॉट नं. ७९, विमल अपार्टमेंट, शास्त्री ले-आउट, प्रतापनगर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी अनिल शंकर भावे, वय ५४ वर्षे, यांनी आपले अपार्टमेंटचे पार्किंग मध्ये त्यांची बजाज कंपनीची गाडी क. एम. एच. ३१. बी.टी ५७८६ किंमती अंदाजे १०,०००/-रू, ची पार्क करून स्पॅक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादींची नमुद गाडी चोरून नेली. अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलीस ठाणे प्रतापनगर येथे कलम ३७९ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाच्या समांतर तपासादरम्यान, गुन्हेशाखा युनिट क. २ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून त्यांनी आरोपी प्रविण रामरतन शर्मा वय १९ वर्ष यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्याने त्याचे पाच विधीसंघर्षग्रस्त बालक साथिदार यांचे सह सदर गुन्हा केल्याचे कबुल केले, त्याची सखोल विचारपूस केली असता आरोपीने पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीतुन एकुण ५. एम. आय. डी. सी हद्दीतुन १, बजाजनगर हद्दीतुन २ असे एकुण ०८ वाहन चोरी केल्याचे सांगीतले, आरोपीचे ताब्यात सहा मोटरसायकल व चार मोबाईल फोन असा एकुण ३,५०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी व पाच विधीसंघर्षग्रस्त बालक आणि मुद्देमाल पुढील कारवाई कामी प्रतापनगर पोलीसांचे ताब्यात दिली आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सपोआ गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात, पोनि गजानन तामटे, सपोनि गजानन चांभारे, नापोअं, प्रविण शेळके, कमलेश गणेर, गजानन कुबडे, महेन्द्र सडमाके, संदीप चंगोले, पोअं. सुरेश लेलेवार, मंगल जाधव यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्राणांतिक अपघात करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Wed Mar 13 , 2024
नागपूर :-दिनांक १२.०३.२०२४ चे २०.३५ वा. चे सुमारास, गोपालदास भगवानदास खिलवानी वय ५९ वर्ष रा. लालपेठ कॉलोनी, चंद्रपूर, ता. जि. चंद्रपूर हे पोलीस ठणे हिंगणा हद्दीतुन अंबीका हॉटेल अॅण्ड बार, डोंगरगाव, वर्धा रोड, नागपूर येथुन रोडने पायदळ जात असतांना शिवशाही बस क. एम. एच ०६ बी.डब्लू ३६२२ चे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे, हयगईने चालवुन गोपालदास खिलवानी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights