महाविद्यालयीन दृष्टिहीन विद्यार्थ्यांना लॅपटॅपचे व स्मार्ट चष्म्याचे वितरण

– दृष्टिहिन विद्याथ्यांना ‘स्मार्ट’ बनविणार दीक्षाभूमी आंबेडकर कॉलेज !

नागपूर :- डॉ. आंबेडकर कॉलेज दिक्षाभुमी येथील, येत्या 30 नोव्हेंबर रोजी, हेल्प द ब्लाइंड फाउंडेशन चेन्नई यांच्या वतीने अंध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगार, स्मार्ट चष्मा आणि लॅपटॉपचे वितरण केल्या जाईल. ही मध्य भारतातील एक प्रमुख शैक्षणिक संस्था आहे. ज्याची स्थापना 1964 मध्ये झाली. ही संस्था गेल्या वीस वर्षापासून सामान्य विद्यार्थ्यांनाच नाही तर दृष्टीहीन विद्यार्थ्यांनाही उत्तम शैक्षणिक सुविधा पुरवते. ही संस्था कॅम्पस मध्ये अंध विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यामध्ये सॉफ्टवेअर, संगणक आणि कीबोर्ड यांचा समावेश होतो. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान वापरण्याचे आणि स्वावलंबी होण्याची प्रशिक्षण दिल्या जाते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर के. आनंद, यांची उपस्थिती राहणार आहे. आणि श्री नटराज शंकरन ट्रस्टी चेन्नई आणि जे. राधाक्रिष्णन सुद्धा उपस्थित राहतील. अशी माहिती प्राचार्य बी.ए.मेहेरे यांनी पत्रकारांना दिली. पत्रपरिषदेत प्राचार्य बी ए मेहेरे, जे राधाकृष्णन, प्रा. शैलेश बहादुरे आणि प्रा. रोहिण मेश्राम यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रशांत महल्ले आणि तनु गभने करणार कामठी तालुक्याचे प्रतिनिधित्व

Sun Oct 29 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार व कामठी पंचायत समिती अंतर्गत प्रशांत महल्ले व तनु गभने यांची दिल्ली येथे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश ‘ उपक्रमासाठी निवड झाली असून ते कामठी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. जिल्हातील ग्रामस्तरावर 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान अमृत कलश यात्रा काढून घरोघरी माती गोळा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!