– तक्रारींचे वेळेत निराकरण करून अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे निर्देश
नागपूर :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात प्राप्त विविध तक्रारींवर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्याशी उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव, माजी महापौर संदीप जोशी यांनी चर्चा केली.
बुधवारी १० जुलै रोजी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात आयोजित बैठकीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अजय चारठाणकर, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त प्रकाश वराडे, डॉ. रंजना लाडे, परिवहन व्यवस्थापक गणेश राठोड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, सहायक आयुक्त अशोक घारोटे, प्रमोद वानखेडे, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडे, विजय गुरूबक्षाणी, कमलेश चव्हाण, राजेंद्र राठोड, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशनी तेलगोटे आदी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव माजी महापौर संदीप जोशी यांनी उपमुख्यमंत्री कार्यालयात प्राप्त तक्रारींची माहिती आयुक्तांपुढे ठेवली. मनपा आयुक्तांनी तक्रारकर्ते आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधून आवश्यक ते निर्देश दिले. दीनदयालनगर फ्रेन्डस सोसायटी लेआउट येथील ३० वर्षापासूनचा वाहतुकीचा रस्ता अनधिकृतरित्या बंद केल्याबाबत तसेच सांडपाणी व पावसाच्या पाण्याच्या जोडण्या तोडल्याबाबतच्या तक्रारीवर आयुक्तांनी सांडपाणी व पावसाच्या पाण्याच्या तुटलेल्या जोडण्या तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. रहाटे नगर टोली रामटेकेनगर येथील रमाई घरकुल योजनेचा आयुक्तांनी आढावा घेतला. सदर वस्तीकरीता ५ जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष शासन निर्णय निर्गमित केल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव माजी महापौर संदीप जोशी यांनी यावेळी दिली. सदर वस्तीमधील रमाई घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी नंदनवन सेवा समितीद्वारे यावेळी परिसरातील अनेक समस्या मांडण्यात आल्या. नंदनवन कॉलनी उद्यानाच्या बाजुला ऐतिहासीक भोसलेकालीन बाहुली विहीर आहे. या ठिकाणी सभोवताल सौंदर्यीकरण करण्याची मागणी करण्यात आली. या ठिकाणी वरिष्ठ अधिका-यांनी भेट देउन पाहणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. नंदनवन कॉलनी गार्डन मधील ग्रीन जीमचे व्यवस्थापन तसेच लहान मुलांची तुटलेली खेळणी याबाबत आवश्यक ती खेळणी तातडीने दुरूस्त करणे व अन्य बदलवून घेण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जगनाडे चौक ते केडीके कॉलेज रोड ते संत गोरा कुंभार चौकापर्यंत तसेच राजेंद्रनगर चौक मार्गावर अपघाताच्या घडणा-या घटनांबाबत वाहतूक विभागाद्वारे तांत्रिक बाबींची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. नंदनवन कॉलनी डॉ. दलाल दवाखान्यामागची लाईन येथे वेस्ट वाटर लाईन तुटलेली आहे. त्याची स्वच्छता आणि दुरूस्ती करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. केडीके कॉलेज रोड राजेंद्रनगर येथील (निलम पान पॅलेस समोरील) ते कुंभारटोली येथील रस्ता खराब झालेला असून येथे डांबरीकरण अथवा सिमेंटीकरण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. संबंधित झोनद्वारे तातडीने रस्ता दुरूस्त करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिले. राजेंद्रनगर चौक ते हसनबाग सिमेंट रोड विषयी देखील कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले.
नाईक लेआउट, सुभाषनगर येथील सिवर लाईनच्या समस्येबाबत नागरिकांशी आयुक्तांनी संवाद साधला. नागरिेकांना वारंवार होत असलेला त्रास लक्षात घेता समस्येचे पूर्णपणे निराकरण करण्यासंदर्भात तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. रजत हिल सोसायटी, काचीमेट, अमरावती रोड येथे मीनी एसटीपी बसवून ते कार्यान्वित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. माटे चौक (बोधीसत्व चौक) येथील डोमिनोज पिज्झा समोरील रोड डिव्हायडर हटवून सदर चौक वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने सुधारणा करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली. या ठिकाणी भेट देउन तांत्रिक अडचणी जाणून घेण्याचे निर्देश मनपा आयुक्त यांनी दिले. गड्डीगोदाम येथील विविध समस्यांबाबत स्थानिक नागरिकांशी आयुक्तांनी संवाद साधला. येथील सार्वजनिक प्रसाधनगृहाबाबत झोनच्या अधिका-यांनी भेट देण्याचे त्यांनी निर्देश दिले.
संत गजानन गृहनिर्माण सहकारी संस्थेला रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. यावर आयुक्तांनी संस्थे लगतच्या मनपाच्या मोकळ्या जागेवर फलक लावणे आणि रस्त्याचे खडीकरण करण्याचे निर्देश दिले.