आय लव्ह कामठी गेले चोरीला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उनगर मानले जाणारे कामठी शहराची जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल मुळे जगाच्या नकाशात नोंद करण्यात आली आहे.तसेच येथील सैन्य केंद्रामुळे कामठी शहराचे महत्व मोठे आहे तर कामठी शहराची ओळख ही आणखी सर्वदूर व्हावी या हेतूने कामठी नगर पालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील मध्य भाग असलेल्या जयस्तंभ चौकात ‘I LOVE KAMPTEE”चे स्ट्रेचर लावून कामठी शहरावीषयी प्रेम निर्माण करण्याचे प्रयत्न केले असता ही नवीन नामावली शहरात चर्चेचा विषय ठरत तरुण पिढी या नामावली समोर उभे राहून सेल्फी काढताना दिसत होते तर सायंकाळ होताच प्रकाशमय वातावरणात लखलखत्या प्रकाशझोतात ही नामावली आकर्षित ठरत असल्याने बऱ्याच लोकांना या नामावली समोर उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह आवरता येत नव्हता .

त्यातून आम्ही कामठीवासी ,कामठी शहरावर आमचे खूप प्रेम आहे असे दर्शवित उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करीत असत मात्र चोरट्यांची कुठली जात नसते या अज्ञात चोरट्यानी ही आय लव्ह कामठी ची नामावली स्ट्रेचर चोरून नेल्याने ही शोभणीय जागा फक्त शो पीस ठरली आहे.

कामठी शहरातील सैन्य केंद्र, विश्वप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल ,आदीमुळे प्रसिद्ध पावलेल्या कामठी शहराची ओळख आणखी सर्वदूर होऊन शहरवासीयांच्या मनात कायम असावी यासाठी कामठी शहरातून जाणाऱ्या नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कामठी शहराच्या मध्यभागी असलेल्या जतस्तंभ चौकाच्या कडेला असलेल्या जयस्तंभ च्या बाजूला सौदर्यीकरणातून कामठी नगर परिषद ला प्राप्त होणाऱ्या निधींतुन खर्चाची तरतूद करून ‘आय लव्ह कामठी’ असे नामावलीचे स्ट्रेचर लावण्यात आले होते हे अतिशय आकर्षक ठरत असून शहराविषयी प्रेम असल्याचे कृतज्ञता व्यक्त होते तर या नामावली च्या बाजूलाच असलेले बस स्थानाकावर थांबलेली विद्यार्थिवर्ग तसेच तरुण मंडळी मोबाईल ने या नामावली समोर उभे राहून सेल्फी काढत आनंदोत्सव साजरा करताना दिसत होते .हे आकर्षक दिसणारे आय लव्ह कामठी नामावली स्ट्रेचर चोरीस गेल्याने नगर परिषद चा खर्चिला निधी पाण्यात बुडाला असून आकर्षक अशी नामावली चोरीस गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्व. यादवरावजी भोयर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Thu May 2 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :-श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी या न्यासाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार स्व. यादवरावजी भोयर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक २ मे २०२४ ला सकाळी ११.०० वाजता संस्थेच्या कामठी येथील शैक्षणिक परिसरातील स्व. यादवरावजी भोयर मेमोरियल हॉल येथे अभिवादन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर, सचिव सुरेश भोयर तसेच संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोयर, अनुराग भोयर यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com