– 70 वर्षात काॅग्रेसने गोर गरीबांना ठेवले वंचित
– पारशिवनी येथे अल्पसंख्यांक आघाडीच्या कार्यकर्त्यांचा हस्ते उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत
पारशिवनी :- पारशिवनी येथील जुना बसस्थानक चौकात आज ( दि.16) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महायुतीचे उमेदवार राजु पारवे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे तडफदार उपमुख्यमंत्री तथा विकासपुरुष माननीय देवेंद्र फडणीस यांनी राज्यातील विकास कसा होत आहे.व केंद्रात मोदीजींचे काम हे सराहनीय असल्याचे व 25 कोटी गरीब जनतेला गरीबीच्या बाहेर काढले असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातुन सांगीतले. या प्रचारसभेवेळी रामटेक विधानसभा क्षेत्राचे युवा व तडफदार नेतृत्व असलेले सामाजीक कार्यकर्ता उदयसिंग ऊर्फ गज्जु यादव यांनी हजारोंच्या संख्यासमवेत देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थीतीत पक्षप्रवेश केला. या सभेला नागपूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे , आमदार आशिष जयस्वाल , माजी आमदार डी.मल्लीकार्जुन रेड्डी , तालुकाध्यक्ष योगेश वाडीभस्मे , माजी नगराध्यक्षा प्रतिभा कुंभलकर , भाजप नेते सुधाकर मेंघर , माजी समाजकल्याण सभापती हर्षवर्धन निकोसे , संजय मुलमुले , राजेश ठाकरे यांनी उपस्थीतांना मार्गदर्शन केले.
या प्रचारसभेत प्रकाश वांढे , अशोक कुथे , अर्शद शेख , राजेश कडु , श्याम भिमटे , सागर सायरे , प्रतिक वैद्य, राहुल नाकले , रेखा दुनेदार , छाया येरखेडे , माधुरी बावणकुळे , डाॅ.प्रमोद भड , ओमप्रकाश पालीवाल , राजु भोस्कर , प्रेम भोंडेकर , रोशन पिंपळामुळे , राजेश गोमकाळे , गौरव पनवेलकर , नरेंद्र बावणकुळे , राजु भोयर , कविता मस्के , शकील शेख , परसराम राऊत , आसिफ कुरैशी , वसीम बाघाडे , नहीम शेख , रुपाली फाले , दिगांबर खुबाळकर , मनीषा धुरई , जितेंद्र गोन्नाडे , गुलनाझ शेख सह भाजप कार्यकर्ते , शिवसैनीक हजारोंच्या संख्येने उपस्थीत होते. याप्रसंगी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा ग्रामीण महामंत्री अर्शद शेख , नागपूर ग्रामीण उपाध्यक्ष शकील शेख , जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष आशिक कुरेशी व कार्यकर्त्यांचा हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.