सिंगद ग्रामस्थांचा निर्धार ; पुन्हा एकदा मोदी सरकार !

– राजश्री पाटीलच्या प्रचार सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

यवतमाळ :- दिग्रस तालुक्यातील सिंगद येथे राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राला राजश्री पाटील यांच्यासारख्या उच्चशिक्षीत, अभ्यासु आणि दुरदृष्टी असलेल्या उमेदवार मिळाल्याने मतदारांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सिंगद वासियांनी राजश्री पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आणि पुन्हा एकदा मोदी सरकार निवडुन आणण्याचा निर्धार केला.

लोकसभा निवडणुक ऐन भरात आली आहे. उमेदवारांकडुन जोरकस प्रचार करण्यात येत आहे. अशात काल दि. १६ रोजी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांची दिग्रस तालुक्यातील सिंगद येथे प्रचार सभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी मतदारांशी संवाद साधतांना राजश्री पाटील यांनी यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राच्या विकासाचे व्हिजन मतदारांसमोर ठेवले.

मोदीच्या नेर्तत्वात मतदारसंघात मोठया प्रमाणात विकासकामे खेचून आणण्याचा मानस राजश्री पाटील यांनी बोलून दाखविला. याचबरोबर विकसीत भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन मतदारांना केले. यावेळी महायुतीचे नेते पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी राज्य आणि केंद्र सरकारने केलेल्या विकासकामांचा पाढाच वाचला. देशाला परम वैभव प्राप्त करून देण्यासाठी महायुतीला साथ द्या, असे आवााहन केले.

प्रचार सभेला भाजपा जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे, रिपाईचे महेंद्र मानकर, शिवसेनेचे राजकुमार वानखेडे, सुधीर देशमुख, जेष्ठ नेते राजन मुख्ररे, राष्ट्रवादीचे दौलत नाईक, भाजपाच्या आरती फुपाटे, उमाकांत पापीनवार, भगवानराव आसोले, सदबाराव मोहटे, गणेश वागीरे, दिपक उखळकर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते युवा वर्ग, महीला मंडळ आणि मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बसपाचे संदीप मेश्राम यांची रामटेक प्रचारात आघाडी 

Wed Apr 17 , 2024
रामटेक :- बहुजन समाज पार्टी रामटेक लोकसभेचे अधिकृत उमेदवार संदीप मेश्राम यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनी सहाही विधानसभेतील प्रत्येक प्रमुख गावांमध्ये जनसंपर्क केला आहे. आत्तापर्यंत त्यांनी उमरेड, हिंगणा, कामठी, सावनेर, रामटेक, काटोल विधान सभेतील सर्व प्रमुख व लहान गावांनाही भेटी दिलेल्या आहेत. संदीप मेश्राम हे विशेषता आपल्या दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करतात. तसेच प्रत्येक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com