रामटेक :- बहुजन समाज पार्टी रामटेक लोकसभेचे अधिकृत उमेदवार संदीप मेश्राम यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनी सहाही विधानसभेतील प्रत्येक प्रमुख गावांमध्ये जनसंपर्क केला आहे. आत्तापर्यंत त्यांनी उमरेड, हिंगणा, कामठी, सावनेर, रामटेक, काटोल विधान सभेतील सर्व प्रमुख व लहान गावांनाही भेटी दिलेल्या आहेत.
संदीप मेश्राम हे विशेषता आपल्या दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करतात. तसेच प्रत्येक बुद्ध विहाराला व बौद्ध वस्त्यांना भेटी देतात. आत्तापर्यंत त्यांनी 410 बुद्ध विहारांना, 120 बाबासाहेबांच्या पुतल्यांना तसेच 311 सार्वजनिक स्थळाना भेटी दिलेल्या आहेत.
बसपा ही बहुजन महापुरुषांचा मान सन्मान करीत असल्याने ज्या ज्या गावात शिवाजी महाराज, महात्मा फुले, बिरसा मुंडा, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज आदींच्या पुतळ्याला सुद्धा अभिवादन करत असतात. त्यांच्या सोबत बँड व घोषणा देणार्याचा जथ्या असतो. सोशल मीडिया हाताळणारी तरुणांची फोजही त्यांच्या दिमतीला असते.
त्यांच्या झंजावती दौऱ्यात 15 गाड्यांचा ताफा असून चार प्रचार रथ आहेत. त्यांनी आतापर्यंत वाडी, बाजारगाव, कोंढाळी, सावनेर, खापरखेडा, कन्हान, भिवापूर, शिरसी, मौदा, जलालखेडा, मनसर, देवलापार, नरखेड, कळमेश्वर, कुही, मांडळ, पचखेडी, अंभोरा, शंकरपूर, बेसा, बेलतरोडी, हुडकेश्वर, वेळा, खापरी, रुई पांजरी, बुट्टीबोरी आदी प्रमुख गावांमध्ये पदयात्रा व प्रचार दौरा केलेला आहे.
त्यांनी प्रत्येक विधानसभेत दोन दोन प्रचार प्रमुख कार्यालय सुरू केलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या दौऱ्यात विधानसभेतील व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सहभागी असतात. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश बसपा प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, जिल्हा कोषाध्यक्ष महेश वासनिक, जिल्हा सचिव अभिलेश वाहने, तारा गौरखेडे, शशिकांत मेश्राम, रुपराव नारनवरे, चंद्रगुप्त रंगारी, ज्ञानेश्वर तागडे, राजेश फुलझेले, दिनेश रंगारी, पुनेश्वर मोटघरे, पराग रामटेके, सतीश शेळके, सदानंद जामगडे, रोहीत इलपाची, वीरेंद्र कापसे, साधना काटकर, प्रिया गोंडाणे आदि नागपूर जिल्हा ग्रामीण विधानसभेतील प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने सहभागी आहेत.