संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अनेक दिवसा पासुन करण्यात येत होती. परंतु नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही. शेवटी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यामुळे सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देत असतांना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची मागणी सुध्दा करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निश्चितच संतोष देखमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल असा विश्वास ॲड. सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केला.