ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई :- “आपल्या अभिनयाने नाटक, चित्रपट, मालिका आणि ओटीटी अशा विविध माध्यमांत अमीट ठसा उमटवणारे, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनाने केवळ एक उत्तम अभिनेता नाही, तर अनेक कलाकारांचा मार्गदर्शक हरपला आहे”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “जयंत सावरकर यांनी चार पिढ्यांसोबत काम केले. त्यांनी मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका केल्या. त्यांचे विश्व इतके अनुभवसिद्ध होते की त्यातून नव्या पिढ्या घडत होत्या. एक ऊर्जावान आणि आपल्या विचारांवर ठाम असलेला अभिनेता आपण गमावला आहे. त्यांनी साकारलेला ‘अंतू बर्वा’ कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना”!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मणिपूर मधील घटना निंदनीय - अजय कदम

Mon Jul 24 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – दोषींना फाशीची शिक्षा न झाल्यास बरीएम तर्फे शहरात तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा कामठी :- मणिपूर मध्ये जमावाकडून दोन महिलांना पकडण्यात आले ,त्यानंतर त्यांना विवस्त्र करून त्यांची नग्न धिंड काढण्यात आली.या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून ही घटना अतिशय निंदनीय असून मानवतेला काळिमा फासणारी आहे.त्या पीडित महिलांची अशी विवस्त्र धिंड काढनाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com