उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रमजान ईदच्या शुभेच्छा

रमजान ईद एकोप्यानेउत्साहाने साजरी करुया

   मुंबई : ईद-उल-फित्र तथा रमजान ईद सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धीआनंदउत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकतासमताबंधुत्वाची भावना वाढीस लागो. रमजान ईदच्या निमित्ताने वंचित बांधवांना मदत करुन त्यांच्या जीवनात आनंद आणूया. यंदाची ईद एकोप्यानेआनंदानेउत्साहाने साजरी करुया. मानवकल्याणविश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देऊया…, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

            रमजान ईदनिमित्ताने दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात कीरमजानचा पवित्र महिना आणि त्यानंतर येणारा ईदचा सण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा होतो. मुस्लिम बांधवांच्या बरोबरीने सर्वधर्मीय बांधव ईदच्या आनंदात सहभागी होतात. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात साजरी होणारी रमजान ईद समाजात आनंदउत्साहाचे वातावरण घेऊन येईल. देशवासियांमध्ये एकजुटीचीसहकार्याचीबंधुत्वाची भावना वाढीस लावेल. ही भावनाच महाराष्ट्रालादेशाला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवेलअसा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ईद-उल-फित्र निमित्त शुभेच्छा

Tue May 3 , 2022
मुंबई :- मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्र निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.             “दयाभाव आणि दातृत्व यांचे महत्व सांगणारा हा सण आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देणारे हे पर्व सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com