हद्दपार आरोपीस अटक..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 6 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस ठाण्या हद्दीतील हद्दपार आरोपीस जुनी कामठी पोलिसांनी अटक केल्याची कारवाई गतरात्री साडे बारा वाजे सुमारास केली असून मोहम्मद शाहिद अन्सारी उर्फ साजीद ईजाज अन्सारी वय 36 असे अटकेतील आरोपी चे नाव आहे.

जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुनी कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस पथक रात्र गस्तीवर असताना हद्दपार असलेला आरोपी मोहम्मद शाहिद अन्सारी उर्फ साजीद ईजाजअन्सारी वय 36 राहणार वारीसपुरा कामठी विविध गुन्ह्यात लिप्त असून त्याला तत्कालीन पोलीस उपायुक्त निलोत्पल यांनी 28 डिसेंबर 2020 ला दोन वर्षाकरिता कामठी व नागपूर शहराच्या बाहेर हद्दपार केले होते मात्र आरोपी मोहम्मद शाहिद अन्सारी उर्फ साजीद ईजाज अन्सारी याने पोलीस प्राशसन नियमाचे तसेच हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून वारीसपुरा नाल्याजवळ कामठी येथे दिसून आल्याने पोलिसांनी सदर हद्दपार आरोपीस अटक करून त्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा भादवी कलम 142 अनव्ये जुनी कामठी पोलीसानी गुन्हा दाखल केला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

फेटरी मे महापरिनिर्वाण दिवस पर अन्नदान

Tue Dec 6 , 2022
सौरभ पाटील, प्रतिनिधी   फेटरी :-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस पर फेटरी गाव मे सामाजिक कार्यकर्ता दिवाकर पाटणे की अगुवाही मे अभिवादन कार्यक्रम सम्पन्न हुवा.सर्वप्रथम दिवाकर पाटणे ने डॉ.बाबासाहेब आंबेडकर के छायाचित्र पर माल्यार्पण कर मोमबत्ती प्रजवलीत कर अभिवादन किया၊ इस दौरान बबलू ढोमने, रत्ना फोफरे, फुलवन्ती साखरे, मुद्रका वलके, वनमाला कांबले, सरोजनी अंबादे, प्रदीप शुक्ला, उत्तम ढोमने, सनातलाल ठाकरे, मंजुषा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com