कडाजना येथे आज भक्तांची मांदियाळी, बालयोगी रामचंद्रबाबांचा समाधी सोहळा

बेला :- जवळच्या कडाजनाक तीर्थक्षेत्र स्थळी पंचक्रोशीचे प्रख्यात संत बालयोगी रामचंद्रबाबा यांचा समाधि सोहळा उत्साहात साजरा होत आहे. त्या प्रित्यर्थ आश्रमात 20 सप्टेंबर पासून अखंड हरिनाम धार्मिक सप्ताह सुरू आहे. आज मंगळवारला कडाजना ते बेला अशी भव्य पालखी दिंडी यात्रा निघणार आहे. त्यासाठी असंख्य भक्तांची मांदियाळी येथे पहायला मिळणार आहे.

संतभूमी बेला येथे संत रामचंद्र महाराज यांची महिमा अपरंपार आहे. त्यांच्यावर अपार श्रद्धा असणारे हजारो भक्तगण विदर्भात सर्व दूर आहे. त्यामुळे बेला व कडाजना पावनभूमी ठरली. इसवी सन 2012 ला महाराजांचे वैकुंठ गमन झाले. यंदा त्यांचा अकरावा समाधी सोहळा उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्त आश्रमात ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ व विविध मंडळांचे भक्ती संगीत व भजने नित्यनेमाने सुरू आहे. आज मंगळवार ला सकाळी 11 वाजता कडाजना टेकडीवरील आश्रमातून हजारो भक्त रामचंद्रबाबांचा जयघोष करीत, पालखी दिंड्यांच्या टाळ मृदंगाच्या गजरात व ढोल ताशाच्या निनादात बेला नगरीकडे प्रस्थान करतील. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही भव्य पालखी दिंडी यात्रा गावात भ्रमण करेल. त्यावेळीचे नयनरम्य सोहळ्याने असंख्य भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटतील. उद्या बुधवारला ह भ प प्रकाश महाराज चंदनखेडे यांचे गोपालकाल्याचे किर्तन होईल व तदनंतर भव्य महाप्रसाद संपन्न होईल. असे देवस्थानचे अध्यक्ष दिलीप मुळे, वसंतराव मुठाळ, देवराव नरड, यादवराव मुठाळ, गजानन दौलतकर, अरुण बावणे, विलास मुळे,विलास कोटमकर व इतर पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छता ही सेवा पंधरवाडा अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी पार पडली कार्यशाळा 

Tue Sep 26 , 2023
– सेवा व सुरक्षा शिबीर तसेच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी   चंद्रपूर :- सफाई करणारे कर्मचारी हे सार्वजनीक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे कार्य करतात, इतके महत्वाचे काम करीत असतांना त्यांचे स्वतःच्या आरोग्याबद्दल दुर्लक्ष होते. ज्याप्रमाणे घरात कर्त्या व्यक्तीचे स्वास्थ्य उत्तम राहणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे स्वच्छता योद्धे असलेले स्वच्छता कर्मचारी यांचे स्वास्थ्य उत्तम राहणे गरजेचे असल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी स्वच्छता कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com