संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आरोग्य हीच खरी संपत्ती असून आपल्या शरीरातील महत्वाचा घटक म्हणजे दात.अन्न पचनाची सुरुवात ही तोंडातून होत असते आणि तोंडातील महत्वाचा अवयव म्हणजे दात .या दातांची निगा व स्वच्छता राखणे काळाची गरज असल्याचे मौलिक प्रतिपादन कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय च्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ नयना धमाळे यांनी उपजिल्हा रुग्णालयात आयोजित वैद्यकीय आरोग्य तपासणी, दंत रोग तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबीर अंतर्गत आरोग्य मेळाव्यात बोलत होते.
काल 18 जानेवारीला महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा अंतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर मंडळ नागपूर ,जिल्हा शल्य चिकित्सक ,सर्वोपचार रुग्णालय नागपूर,जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नागपूर आणि वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कामठी च्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित आरोग्य मेळाव्याचे उदघाटन आमदार टेकचंद सावरकर यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून व लाल फीत कापून करण्यात आले. तसेच त्यांचे मार्फत संबंधित आरोग्य प्रदर्शनीची पाहणी करण्यात आली.याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन बी राठोड,निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ गणेश कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमा अंतर्गत एकूण 1044 लाभार्थ्यांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला त्यापैकी 18 वर्षावरील 370 पुरुष यांची वैद्यकोय तपासणी करून औषधोपचार करण्यात आला.सदर आरोग्य मेळावा वैद्यकीय अधिक्षिका डॉ नयना धुमाळे यांच्या मार्गदर्शनार्थ उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि तज्ञ वैद्यकिय अधिकारीच्या चमुच्या उपस्थितीत तपासणी करून मेळावा संपन्न झाला.शिबिराअंती एकूण 15 रुग्णांची शल्यक्रिये करिता निवड करण्यात आली.