संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
नागपूर – हिंगणा वन परिक्षेत्र, नेरी मानकर नियत वनक्षेत्रात दिनांक 28/10/22 ला नाल्यामध्ये मृत वाघीण गस्त दरम्यान दिसून आली.
हिंगणा वनपरिक्षेत्र चे कर्मचारी संध्याकाळी गस्त करीत असताना उपक्षेत्र उमरी (वाघ) नियत क्षेत्रं नेरी मानकर, कक्ष क्रमांक 151PF, येथील चंकापुर नाल्यामध्ये 3-4 वर्ष वयाची वाघीण मृत असल्याचे दिसून आलें . लागलीच वरिष्ठ अधिकारी यांना कळविण्यात आले. रात्र झाली असल्याने शव विच्छेदन दुसऱ्या दिवशी सकाळी करण्याचे ठरले. सकाळी हिंगणा वनपरिक्षेत्र चे कर्मचारी यांनी NTCA च्या मार्गदर्शन सूचना नुसार कार्यवाही केली. घटना स्थळी नागपूर वन विभाग नागपूर चे उपवनसंरक्षक पी जी कोडापे, सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, आशिष निनावे, वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती रीना राठोड, विजय गंगावणे, कापगते, सारिका वैरागडे, व वनकर्मचारी उपस्थीत होते.
तसेच NTCA प्रतिनिधि अजिंक्य भटकर मानद वन्यजीव संरक्षक, PCCF (wildlife) चे प्रतिनिधि उधमसिंग यादव मानद वन्यजीव संरक्षक यांचे समक्ष पंचनामा तयार करण्यात आला. तर शवविच्छेदन डॉ. किशोर भदाने, डॉ सुदर्शन काकडे, डॉ. सुजित कोलांगत पशू वैद्यकीय अधिकारी यांनी केला. प्राथमिक माहिती नुसार वाघिणीचा मृत्यू हा हृदय श्वसन क्रिया बंद पडल्याने ( Cardiac respiratory failure) झालेला असल्याचे दिसून आले आहे. फॉरेन्सिक करीता नमुने घेण्यात आले असुन RFL नागपूर येथे पाठविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानंतर दहन पंचनामा नोंदवण्यात आला. याकरिता रंगनाथ नईकडे, मुख्य वनसंरक्षक नागपूर वनवृत्त यांचे मार्गदर्शना खाली उपवसंरक्षक पी जी कोडापे यांनी कार्यवाही केली असुन पुढील तपास आशिष निनावे सहायक वनसंरक्षक (अतिरिक्त कार्यभार) नागपूर हे करित आहेत.