संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दुर्गा चौकातील नगर परिषद चाळीच्या दुकान नं 4 मध्ये विनापरवाना अवैधरीत्या गेमिंग मशीन अंतर्गत सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात डिसीपी पाच पथकाला गतरात्री यशप्राप्त झाले असून या धाडीतून तीन आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करीत नगदी 1470 रुपये,11 गेमिंग मशीन किमती 1 लक्ष 10 हजार रुपये असा एकूण 1 लक्ष 11 हजार 470 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक तीन आरोपी मध्ये समीर अहमद जमिल अहमद वय 33 वर्षे रा वारीसपुरा,आरिफ अख्तर अब्दुल कदिर वय 32 वर्षे रा नया गोदाम, रमेश मुळे वय 38 वर्षे रा बजरंग पार्क कामठी असे आहे.ही यशस्वी कारवाही डीसीपी निकेतन कदम यांच्या नेतृत्वात पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर,अंकुश गजभिये,रवी शाहू, अरुण चांदणे,योगेश ताथोड यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे.