नागपूर : समाजाला कीर्तन -अभंगाच्या माध्यमातुन शिकवणी देणारे संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९७ व्या जयंती निमित्त नंदनवन चौक स्थित प्रतिमेला मा.महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तदनंतर नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये संताजी जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राला महापौर श्री.दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. रविंद्र भेलावे, उपायुक्त श्री. विजय देशमुख, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी श्री. विजय कोल्हे, सहाय्यक आयुक्त श्री. महेश धामेचा, आरोग्य अधिकारी डॉ. गजेन्द्र महल्ले यांनी पुष्प अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
संत जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्हयातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे गावी झाला. त्यांनी संत तुकाराम महाराजांसोबत अध्यात्म आणि विज्ञान लोकांना समजावून सांगितले. संताजींची काव्य प्रतिभा विलक्षण होती.
या प्रसंगी माजी उपमहापौर शेखर सवरबांधे, माजी नगरसेवक सागर लोखंडे, नाना झोडे, दिलीप मेश्राम, युवा आघाडी विदर्भ यांच्यासह संताजी नवयुवक मंडळाचे पदाधिकारी सुभाष घाटे मंगेशभाऊ सातपूते, प्रविण बावनकुळे, अनिल गुजरकर, रुपेश कांबळे, मंगेश बारई, पंकज सावरकर, सुभाष ढबाले, सागर गंधर्व, भास्कर लांजेवार, गिरिष महाजन, अनिल पेटकर, सुभाष तडस, राकेश इखार, विष्णु बोन्द्रे, शुभम तडस, संजय फटिंग, अनिल महाकाळकर, हरिष महाजन, रमेश आकरे, योगेश लांजेवार, पवन महाकाळकर, रुपेश हाडके, गजानन दांडेकर, पंकज वंजारी आदी उपस्थित होते.
दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com