संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन आर्थिक मदत करण्याची मागणी .
कन्हान :- खोपडी (खेडी) येथील शेतकरी रविंद्र सोमकुंवर यांच्या शेतात विहिरीतुन पंपने पाणी घेण्याकरिता लावलेले सोलर पैनल चे वादळी वाऱा व पावसामुळे उडुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कन्हान पासुन पुर्वेस ८ किमी अंतरावर रविंद्र सोमकुंवर यांची तीन एकर शेती खोपडी (खेडी) येथे असुन मागच्या वर्षी आठव्या महिन्यात पीएम कुसुम सोलार योजने अंतर्गत त्यांनी आपल्या शेतात वीहिरीतुन पंपने पाणी शेतात घेण्याकरिता सोलर पैनल लावले होते. मात्र गुरुवार (दि.१९) जुन ला सायंकाळी वादळी वा-यासह पाऊस झाल्यामुळे सोलर पैनल जमिनितुन उखडुन उलटे तिलटे पडल्याने सोलर पैनल चे नुकसान झाले आहे. यास्तव रविंद्र सोमकुंवर यांनी तहसिलदारांना लेखी तक्रार करुन शेतात लावलेले सोलर पैनल च्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शासनाकडुन आर्थिक मदत मिळवुन देण्याची मागणी केली असता मा. तहसिलदार मौदा यानी लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन शेतक-यास दिले आहे.